आपलं शहर

आर्ध्या रात्रीला रुग्णालयातील संपला ऑक्सिजन, 6 रुग्णालयातील रुग्णांना करावं लागलं शिफ्ट

मुंबईमधील सहा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपल्यामुळे रात्री 168 रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावे लागले.

मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी 24 तासांमध्ये 8 हजार 479 नवीन रुग्ण सापडले, तर 53 लोकांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत मुंबईमध्ये 5 लाख 79 हजार 311 कोरोनाच्या केसेस आहेत. सध्या 68 हजार 698 रुग्णांवर उपचार चालू आहे.

महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलंय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत फक्त रुग्णच वाढत नसून उपचाराच्या सोयीसुविधांचीही कमतरता भासत आहेत. कुठं ऑक्सिजन बेड नाही, तर कुठं व्हेंटिलेटर नाहीये. मुंबई मधील वाढत्या कोरोना रुग्णांबरोबर हॉस्पिटलमधील ऑक्सिजन देखील कमी होत आहे. मुंबई मधील सहा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमी निर्माण झाली असून 168 कोरोना रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.(At midnight the hospital ran out of oxygen, 6 hospital patients had to shift)

मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मुंबईमधील सहा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपल्यामुळे रात्री 168 रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावे लागले. हे रुग्णांच्या जीवावर बेतले असते. परंतु कोणत्याही रुग्णाला याने हानी झालेली नाही.

बीएमसी कमिशनर इक्बाल सिंह यांनी सांगितले 17 एप्रिलला रात्री एक ते सकाळी पाच वाजेपर्यंत मुंबईमधील सहा हॉस्पिटलमधून 168 रुग्णांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले. ज्या रुग्णांना शिफ्ट केले गेले त्यात 30 रुग्ण आयसीयू मधील होते. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की सर्व रुग्ण आता सुरक्षित आहेत. त्याचबरोबर आता या पूर्ण घटनेवर राजकारण सुरू झाला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले की, बीएमसीवर अजूनही शिवसेनेचे वर्चस्व आहे. उद्धव ठाकरे सरकार आणि शिवसेना यांची आम्हाला लाज वाटते. बीएमसीला 168 कोरोना रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला लागलं कारण हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन संपले होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments