खूप काही

प्रेमाचा रस्ता मुंबई ते झारखंड, फेसबूकवरच्या एका लाईकने केला धोका

फेसबुकवरच्या प्रेमला खर समजून प्रियसी गेली प्रियकराला भेटण्यासाठी थेट झारखंडला परंतु प्रियकर निघाला फ्रॉड.

झारखंडमधल्या गोड्डा जिल्ह्यामधून हैराण करणारी एक प्रेम कहानी समोर आली आहे. ज्याची सुरुवात फेसबुक पासून झाली. फेसबुकवरच्या प्रेमाला खर समजून मुंबईची मुलगी आपल्या प्रियकराला भेटायला थेट झारखंडमध्ये पोहोचली.परंतु तिचा प्रियकर एक फ्रॉड निघाला.

त्या मुलीने रस्त्यात उभ राहून प्रेमाची भीक मागितली परंतु त्या बदल्यात धोकेबाज प्रियकराने भर रस्त्यात तिला मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याने तिच्या पर्समध्ये दीड लाख रुपये आणि तिचे दागिने चोरी करून तो फरार झाला.(A girl who found love on Facebook, ended up getting robbed and assaulted by her lover in broad daylight in Jharkhand’s Godda district)

या प्रेमाची सुरुवात जवळपास तीन वर्षांपूर्वी झाली आहे. फेसबुकवरच्या एका लाईक वरून यांच्यात मैत्री झाली. आणि या मैत्रीचं रूपांतर हळू हळू प्रेमात झालं. एका मिस कॉलवरून त्यांच्या दोघांमध्ये संवाद सुरू झाला. ही मुलगी मुंबईची रहिवासी असून मुंबईमध्ये जॉब करत होती. तर प्रियकर झारखंड मधला असून तो एकदा तिला भेटायला मुंबईला आला होता. त्यानंतर त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत एक साथ राहण्याची वचने देखील घेतली. मुलीने स्वतःच्या मेहनतीने कमावलेल्या पैशाने त्या मुलाला एक बाईक देखील खरेदी करून दिली होती.

शुक्रवारी ही महिला प्रियकराला भेटायला पटनाला गेली होती. पटनामध्ये गेल्यावर तो मुलगा तिला घरी घेऊन जाणार होता. या मुलाचं नाव आहे अभिषेक कुमार. झारखंडमध्ये पोहोचल्यावर अभिषेक मुलीला घरी घेऊन जायला टाळत होता. मुलीने या गोष्टीवर आक्षेप घेतल्यामुळे अभिषेकने भर रस्त्यात तिला मारहाण केली. मुलीला होणारी मारहाण पाहून बाजारात असलेल्या लोकांनी देखील याला विरोध केला. गर्दी वाढत गेली त्यामुळे मुलाने नवरा-बायकोमधील खाजगी भांडण असल्याचे सांगितले. परंतु गर्दी मधील काही लोकांना याच्यावर संशय होता, त्यामुळे त्यांनी ही खबर पोलिसांना दिली.

पोलिस यायच्या आधीच अभिषेक कुमार मुलीचे दिड लाख रुपये आणि दागिने घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. पीडित महिलेला पोलिसांनी पोलिस ठाण्यात बसवले. थोड्याच वेळात पोलिसांनी अभिषेक कुमारला पकडले व मुलीचे दीड लाख रुपये आणि सोन्याचे दागिने तिला परत केले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments