आपलं शहर

मुंबईकरांसाठी अदानी इलेक्ट्रिसिटीची नवी भेट, असा होईल फायदा…

अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड यांच्याकडून मुंबईकरांसाठी ग्रीन एनर्जी इनिशिएटिव्हचा प्रोजेक्ट सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील ग्रीन एनर्जी प्रोजेक्टबद्दल अदानी इलेक्ट्रिसिटी लिमिटेड, मुंबईकडून महत्त्वाची भूमिका बजावली जात आहे. एईएमएल ग्राहकांच्या रेन्यूएबल विजेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मुंबई ग्रीन एनर्जी एनिशिएटिव्ह पुढाकार घेत आहेत.

2023 पर्यंत एईएमएलकडून 30 टक्के ऊर्जा खर्च केली जाणार, त्यानंतर ती 50 टक्कापर्यंत वाढवण्यात येईल. त्यासाठी आरटीसी पॉवरकडून अतिरिक्त 1000 मेगावॅट विज घेण्यास एमईआरसीकडून मान्यता मिळाली असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. यातील 51 टक्क्यांहून अधिक घटक आरई पॉवरचे असणार आहेत.

एईएमलच्या ग्राहकांसाठी फायदा:

अतिरिक्त 66 पैसे दंड देऊन शंभर टक्के आरई पॉवर उपलब्ध करून देण्याच्या विद्यमान योजनेअंतर्गत आरई विज खरेदी करण्याचा पर्याय अनेक ग्राहक निवडू शकतात. एईएमएल आपल्या ग्राहकांना आरई प्रमाणपत्र देण्यात सक्षम असतील, कारण 2022-२३ च्या वर्षअखेरीस राजस्थानमधील हायब्रीड सौर आणि पवन निर्मितीकडून 700 मेगावॅट पुरवठा महाराष्ट्राला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे ग्रीन एनर्जीच्या महत्वपूर्ण घटकांसह अतिरिक्त हजार मेगा वॅट वीजदेखील मुंबईला मिळण्याची शक्यता आहे.

इतर ग्राहकांनाही होणार फायदा:

एमईआरसीच्या मान्यतेनुसार, एईएमएल (महाराष्ट्रातील इतर सर्व डिस्कॉम्स प्रमाणेच) आता आपल्या ग्राहकांना विजेच्या संबंधीत असलेल्या प्रत्येक गोष्टीत 100% वापर करण्यासाठी परवानगी देत आहे. त्यासाठी ग्राहकांना फक्त प्रतियुनिट 66 पैसे जास्त देण्याची गरज आहे.

एईएमएलच्या नवीन उपक्रमाचे जागतिक पातळीवर कौतूक केले जात आहे, आणि या सगळ्यामुळे अपारंपारिक स्त्रोतामधून 25 टक्के किंवा त्याहून अधिक विज मुंबईकरांना मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments