फेमस

मुंबई इंडियन्सला हारवून ऋषभ पंतने सांगितला दिल्ली कॅपिटल्सचा फ्यूचर प्लॅन

मुंबई इंडियन्सवरील विजयानंतर ऋषभ पंत ने सांगितला दिल्ली कॅपिटल चा फ्यूचर प्लॅन

श्रेयस अय्यरची टीम पाच प्रयत्नांतही जे करू शकली नाही ते काम ऋषभ पंतच्या टीमने केले आहे. पंतच्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने रोहितच्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव केला आहे. चेपाक येथे खेळल्या गेलेल्या या लो स्कोअरिंग सामन्यात दिल्लीने मुंबईवर मात केली.

प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा संघ 20 ओव्हरमध्ये 137 धावा करू शकला. यात मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वाधिक 44 धावा केल्या.

पॉवरप्लेमध्ये जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सची मधल्या काही ओव्हर्समध्ये गंभीर दमछाक झाली. त्यांच्या या वाईट परिस्थितीला दिल्ली कॅपिटलचा फिरकीपटू अमित मिश्रा कारणीभूत होता, त्याने आपल्या जबरदस्त गोलंदाजीने मुंबई इंडियन्सच्या चार महत्त्वपूर्ण खेळाडूंना बाद केले. तसेच शिखर धवनच्या 45 आणि स्टीव्ह स्मिथच्या 33 धावांनी दिल्लीला सामना सहज जिंकता आला. 5 चेंडू शिल्लक असताना दिल्लीने हा सामना 6 गडी राखून आपल्या नावावर केला.

सामन्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने मिश्राचे खूप कौतुक केले. पंत म्हणाला,सुरुवातीला आमच्यावर थोडासा दबाव होता, पण मिशी भाईने मुंबईच्या बड्या खेळाडुंना तंबूत पाठवले. हा कमी धावा करणारा सामना होता आणि खेळपट्टी ही फलंदाजीसाठी कठीण होती.

दिल्लीने पुन्हा फलंदाजीत ललित यादवला संधी दिली. ऋषभ पंत म्हणाला की, ललित हा एक महान भारतीय खेळाडू आहे आणि त्याचा खेळ पाहण्याची इच्छा दिल्लीच्या संघ व्यवस्थापकांना आहे. पहिल्या चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकून दिल्लीचा संघ आता दुसर्‍या क्रमांकावर आहे. रविवारी 25 एप्रिल रोजी दिल्लीचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments