कारण

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा 3 मंत्र्यांना फायदा; हसन मुश्रीफ, अजित पवारांची ताकद वाढली…

अनिल देशमुखांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांची गृहमंत्रिपदी वर्णी लागली आहे.

100 कोटी खंडणीच्या प्रकरणाबाबत राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी यासंदर्भात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अनिल देशमुखांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीतल्या इतर तीन मंत्र्यांना फायदा झाल्याचे दिसत आहे. (Home Minister Anil Deshmukh resigns)

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पदाचा राजीनामा स्विकारावा या विनंतीचं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवलं आहे, त्यासोबतच गृहमंत्रिपदी दिलीप वळसे-पाटील यांच्या नियुक्तीला मान्यता द्यावी, यासाठी मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाकडून पत्र पाठवण्यात आलं आहे. (Home Minister’s resignation benefits 3 ministers; Hasan Mushrif, Ajit Pawar’s strength increased)

अनिल देशमुख यांच्याकडे आतापर्यंत गृहमंत्री, कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार आणि उत्पादन शुल्कविभागाचा अतिरिक्त कार्यभार ही पदे देण्यात आली होती. ही सर्व पदे आता दिलीप वळसे पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आली आहेत. अजित पवार यांच्याकडे कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तर हसन मुश्रीफ यांच्याकडे उत्पादन शुल्कविभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे राजीनामा दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. (The unkown story behind the resignation of the Home Minister)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेळ आला आहे. माजी पोलीस आयुक्त परंबीर सिंह यांनी आरोप केल्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीकेची झोड उठवली जात होती. या सगळ्या प्रकरणावर भाजपने आवाज उठवल्याने हे प्रकरण चांगलच तापलं होत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments