फेमस

अजय देवगणची 1 कोटींची मदत, दादरमध्ये उभारणार भव्य कोविड सेंटर

अभिनेता अजय देवगणसह इतर कलाकरांचा महापालिकेला पुन्हा एकदा मदतीचा हात

मागील वर्षी अजय देवगणने मुंबईतील धारावी येथील कोविड सेंटरसाठी ची व्हेंटिलेटरची व्यवस्था केली होती. यावर्षीदेखील अजय देवगण याने छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तयार होत असलेल्या इमर्जन्सी मेडिकल फॅसिलिटी साठी मदतीचा हात पुढे केला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बॉलिवूड पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे करत आहे. अजय देवगणने पुन्हा एकदा कोरोना रुग्णांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी अजय देवगणने धारावीमध्ये बनवल्या गेलेल्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सीजन सिलेंडर आणि दोन पोर्टेबल व्हेंटिलेटर ची सुविधा केली होती. आणि यावर्षी दादर (पश्चिम) येथील ‘कोविड एचडीयू’ रुग्‍णालयाला मदत करत आहे.(Ajay devgan donates hefty amount to set up a 20-bed Covid ICU)

छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील स्‍काऊट-गाईड हॉलमध्‍ये मुंबई महानगरपालिकेने २० रुग्‍णशय्या क्षमतेचे ‘कोविड एचडीयू’ रुग्‍णालय उभारले आहे. त्यामुळे आता हिंदुजा रुग्णालयातच दाखल होण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या या रुग्णालयात अॅडमिट होऊन हिंदुजाच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेता येणार आहे.

प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण यांच्‍या एनवाय फाऊंडेशनने सामाजिक उत्‍तरदाय‍ित्‍व म्‍हणून १ कोटी रुपयांची देणगी महानगरपालिकेला दिली आहे. यामध्‍ये अजय देवगण यांच्‍यासह बोनी कपूर, समीर नायर, रजनिश खानुजा, दीपक धर, तरुण राठी, अशीम प्रकाश बजाज, लीना यादव, आर. पी. यादव, लव रंजन, आनंद पंड‍ित या सर्वांनी देखील वाटा उचलला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments