फेमस

कोरोनातून बरे होताच Alia Bhatt आणि Ranbir Kapoor निघाले मालदीवला…

Alia Bhatt and Ranbir Kapoor हे आज मुंबई विमानतळावर सोबत दिसले. त्यावेळी त्यांच्या दोघांमधील केमेस्ट्री दिसून आली.

महाराष्ट्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. परंत अजून राजकीय नेते लॉकडाऊनवर विचार करत आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटांचे शूटिंग अर्ध्यावर येवून थांबले आहे, यामुळे आता चित्रपटातील कलाकार पुन्हा मालदीवकडे वळल्याचे दिसून येत आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स आलिया भट्ट आणि रणबीर कपूरही मालदीवला रवाना झाले आहेत. (alia bhatt and ranbir kapoor on a vacation trip to maldives)

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर (alia bhatt and ranbir kapoor) हे मुंबई विमानतळावर सोबत दिसले. दोघांनीही सारख्या रंगाचे कपडे परिधान केले होते. रणबीर आणि आलिया दोघेही एकाच कारमधून विमानतळावर पोहोचले होते. याबरोबरच आलियाने एक अतिशय स्टायलिश मास्क घातला होता, ज्यावर हार्टच्या आकाराचे चित्र होते.

गेल्या महिन्यात अनेक कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली होती, त्यामध्ये रणबीर कपूरचाही समावेश होता, तर काही दिवसांनंतर आलियाचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला होता. दोघांनाही घरीच डॉक्टराच्या निगराणीमध्ये ठेवण्यात आले होते. यादरम्यान दोघेही एकमेकांना मनापासून मिस करत होते, हे त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये स्पष्टपणे सांगितले होते (alia bhatt and ranbir kapoor on a vacation trip to maldives after covid negative spotted at airport see photos read latest bollywood news and gossip)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments