आपलं शहर

अमेझॉनने उचलला 10 लाख लोकांच्या लसीकरणाचा खर्च…

अमेझॉन कंपनी आपल्याकडे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसह 10 लाख लोकांच्या लसीकरणाचा खर्च उचलणार असल्याची माहिती समोर येत आहे.

देशातील लोकप्रिय ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन (Amazon) इंडियाने कोरोनाविरूद्ध लढ्यात मदतीचा हात पुढे केला आहे. कंपनीने 10 लाख लोकांच्या लसीकरणाचा खर्च उचलणार असल्याचे म्हटले आहे. यात कर्मचार्‍यांसह कंपनीच्या नेटवर्कमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या सुविधेचा फायदा मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना शक्य तितक्या लवकर कोरोनाची लस (vaccine) मिळेल आणि कोरोनाविरुद्धच्या या लढाईत प्रत्येकजण सुरक्षित राहीलं, यासाठी अमेझॉन प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे.

यासंदर्भात कंपनीने एक निवेदनही जारी केले होते. ज्यामध्ये असे लिहिले होते की कोरोना लसीकरणाचा लाभ फ्लेक्स ड्रायव्हर्स, स्टोअर पार्टनर, ट्रॅकिंग पार्टनर आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. “कोविड -19 ही लस भारतात 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना उपलब्ध होताच अमेझॉन (Amazon) इंडिया कंपनीने आपले कर्मचारी, भागीदार, विक्रेते आणि ग्राहकांना लस देण्यास प्रोत्साहित करत आहे. ज्याद्वारे ते आपले,त्यांच्या कुटुंबाचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे संरक्षण करू शकतील”

अमेझॉनने(Amazon) त्यांच्या कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी आणि सहयोगींसाठी एक व्यापक समर्थन प्रणाली स्थापित केली आहे. ज्यामध्ये त्यांना प्रत्येक प्रकारे मदत केली जाईल. कंपनीच्या वतीने त्यांना COVID-19 च्या उपचारापासून ते रुग्णालयाच्या शोधापर्यंत आणि चाचण्यांच्या व्याप्तीपर्यंतचे खर्च कव्हरेज प्रदान करणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments