फेमस

1 April fools day: केवळ एप्रिल ‘फूल’ डे नाही तर इतिहासात या तारखेला अनेक मोठ्या गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत.

1 April fools day: जगभरातील लोक भलेही 1 एप्रिल हा दिवस मस्ती – मस्करी करण्यासाठी साजरी करतात पण या तारखेला इतिहासामध्ये बऱ्याच गोष्टी नोंदवल्या गेल्या आहेत. भारतातील रिझर्व्ह बँकेची (Reserve bank)स्थापना आणि अमेरिकेमधील ॲपलची( Apple) स्थापना हे आज म्हणजे 1 एप्रिल दिवशी झालं होत.

रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली. केंद्रीय बँकिंग प्रणाली असून नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे याची क्षेत्रीय कार्यालये आहेत.अमेरिकेमधील ॲपलची स्थापना कॅलिफोर्नियामध्ये 1 एप्रिल 1976 रोजी स्टीव्ह जॉब्स स्टीव्ह वोझनिआक आणि रोनाल्ड वेन यांनी ॲपल इंकची स्थापना केली.सुरवातीला याच्या नवत कॉम्प्युटर हा शब्दही होता जो 9 जानेवारी 2007 ला काढून टाकण्यात आला आणि स्टीव्ह जॉब्सने पहिला आयफोन बाजारात लाँच केला.

1 एप्रिल 1582 ला फ्रान्समध्ये हा दिवस मूर्ख दिवस म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली आहे.1912 मध्ये या तारखेला भारताची राजधानी औपचारिकपणे कलकत्त्याहून दिल्लीला हलविण्यात आली. 1 एप्रिल 1930 रोजी विवाहासाठी मुलींचे किमान वय 14 वर्षे आणि मुलाचे वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले.1956 ला कंपनी कायदा लागू करण्यात आला.

1976 रोजी दूरदर्शन या नावाने स्वतंत्र टेलिव्हिजन कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली. 1 एप्रिल 2004 ला गुगलने जीमेलची घोषणा केली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments