फेमस

Happy Birthday Arjit Sigh : अरिजीत सिंहच्या दुसऱ्या लग्नाची अनोखी गोष्ट

अरिजीत सिंहने शाळेतल्या मैत्रिणीबरोबर केले दुसरे लग्न..

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याने स्वतःच्या आवाजाने सगळ्यांना वेड लावले आहे. याच अर्जित सिंह याची दोन लग्न झालेली आहेत. ही गोष्ट मात्र मोजक्याच लोकांना माहित आहे. अरिजीत सिंह ने पहिले लग्न रूपरेखा बनर्जी यांच्याबरोबर केली होती. या दोघांची भेट रियालिटी शो दरम्यान झाली होती. हा शो 2013 मध्ये आला होता. परंतु या जोडप्याचे लग्न जास्त काळ टिकले नाही. ज्यामुळे या जोडप्याने एका वर्षानंतर वेगळ व्हायचा निर्णय घेतला.

त्यानंतर अरिजीत सिंहने दुसरे लग्न त्याच्या शाळेतल्या मैत्रिणीबरोबर केले. परंतु त्याने या लग्नाची गोष्ट कित्येक वर्ष लोकांपासून लपवून ठेवली होती. परंतु ज्या दिवशी त्याने सोशल मीडियावर त्याच्या पत्नी बरोबरचा फोटो शेअर केला तेव्हा सगळ्यांना त्यांच्या लग्नाबद्दल आणि त्यांच्या प्रेमाबद्दल समजले.(Arijit Singh’s love life and two marriages)

अरिजीत सिंह याने बालपणीची क्रश कोमल रॉय हिच्याशी दुसरे लग्न केले. कोमलचे देखील पहिले लग्न जास्त काळ टिकले नव्हते. तिने आपल्या पतीला घटस्फोट दिला आणि मुलीला घेऊन अरिजीत सिंह बरोबर नव्या आयुष्याची सुरुवात केली.

अरिजीत सिंह याने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “आम्हा दोघांना देखील चित्रपटांचा नाद आहे. लहानपणापासून आमची इच्छा होती की, एक तरी चित्रपट बनवावा. सर्वात पहिले लग्नासाठी मी तिला प्रपोज केला”. अरिजीत सिंहने इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया च्या दरम्यान एक चित्रपट बनवला होता. या चित्रपटाची पूर्ण कहाणी आणि या दोघांनी मिळून लिहिली आहे. त्याचबरोबर त्याने सांगितले की, कोयल त्याच्या प्रत्येक नवीन प्रोजेक्टमध्ये त्याची मदत करते. तिला पुस्तक वाचायची खूप आवड आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments