फेमस

धोनी शुन्यावर आऊट, चाहत्यांनी केलं रोहित शर्माला टार्गेट, बाहेर काढली हिस्ट्री

चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईने 188 धावांचा डोंगर उभा केला.

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यातील सामन्यात चेन्नईने 188 धावांचा डोंगर उभा केला होता, मात्र काही चुकांमुळे चेन्नईला हार मानावी लागली. या सगळ्यांध्ये महेंद्र सिंह धोनीदेखील (Mahendra Singh Dhoni) शुन्यावर बाद झाल्याने हारण्याचं ते एक कारण समजलं जात आहे.

IPL चे 14 वे हंगाम सुरु आहे. त्यात चेन्नई आणि दिल्ली यांच्यात दुसरा सामना अगदी अटीतटीचा पाहायला मिळाला, मात्र या सगळ्यात चाहत्यांची निराशा केली, ती म्हणजे महेंद्रसिंग धोनीने. या सामन्यात धोनी शुन्यावर बाद झाला आहे.

धोनी शुन्यावर आऊट झाल्याने सोशल मीडियावर त्याला चांगलच ट्रोल केलं जात आहे. याच ट्रोलर्संना धोनीच्या चाहत्यांनी उत्तर दिलं आहे. महेंद्रसिंग धोनीतर 205 IPL सामन्यात 4 वेळा शुन्यावर आऊट झाला आहे, तर रोहित शर्मा 201 IPL सामन्यात 13 वेळा शुन्यावर आऊट झाल्याचे धोनीच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे धोनी जरी शुन्यावर आऊट झाला असला, तरी अनेकजण रोहीत शर्माची खिल्ली उडवण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. (As soon as Dhoni was out, the fans trolled Rohit Sharma)

धोनीचा खराब डाव

आयपीएल 2020 पासून धोनीची खराब कामगिरी पाहायला मिळत आहे. मागील हंगामात त्याने 14 सामन्यांमध्ये 25 धावांच्या सरासरीने 200 धावा केल्या होत्या. स्ट्राइक रेटही 116.27 होता. संपूर्ण स्पर्धेत त्याच्या फलंदाजीमधून केवळ 16 चौकार आणि 7 षटकार मारलेले पाहायला मिळाले. या मोसमातही तो पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments