फेमस

IPL 14 च्या आधीच खेळाडूंना कोरोनाची लागण, तर काही खेळाडूंना झाली दुखापत

IPL मधील काही खेळाडू शारीरिक दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत.

दिल्ली कॅपिटल्सचा (delhi capitals) खेळाडू श्रेयस अय्यर याला खांद्याच्या दुखापतीमुळे IPL 2021 मधून बाहेर पडावे लागले आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यांमध्ये श्रेयसला दुखापत झाली होती. IPL २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्स फायनलपर्यंत पोहोचली होती. त्याचे श्रेय श्रेयस अय्यरला दिलं जातंय.श्रेयसच्या जखमी खांद्यावर नुकतीच शस्रक्रिया झाली आहे. श्रेयस जवळपास 5 महिने क्रिकेटपासून दूर राहिला.

त्याचबरोबर ऑलराऊंडर अक्षर पटेलला टूर्नामेंट सुरु व्हायच्या आधीच कोरोनाची लागण झाली. त्यामुळे अक्षर पटेल चेन्नईविरुद्धचा पहिला सामना खेळू शकला नाही. IPL 2021 मध्ये खेळात असणारा पेसर एनरिच यालादेखील बुधवारी कोरोनाची लागण झाली.(before IPL 14, players were infected with corona, while some players suffered serious injuries)

रॉयल चॅलेंजर्सचा (royal challengers) देवदत्त पडिक्क्ल याला कोरोनाची लागण झाल्याने त्याला ipl 2021 चा मुंबईविरुद्धचा पहिला सामना खेळात आला नाही. पड्डीकल आता आर सी बी संघात सामील झाला आहे. आता हैदराबादविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तो आर सी बी कडून खेळणार आहे.

पूर्वी राजस्थान रॉयल मधील गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. उपचारानंतर आर्चर याने सर्वाला सुरुवात केलेली आहे. त्याच बरोबर राजस्थान रॉयल मधील बेन स्टोक्स मंगळवारी आय पी एल २०२१ मधून बाहेर पडला. मुंबईत १२ एप्रिलला झालेल्या पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात स्टोक्सच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून त्याची बोट मोडली आहेत. त्यामुळे तो ह्या सिजनमध्ये खेळू शकणार नाही. राजस्थान टीमला आधीच आर्चरमुळे धक्का बसला होता आणि आता स्टोक्सच्या बाहेर आल्याने मोठा धक्का बसला आहे. टीमला स्टोक्सच्या जागी आता कोणी तरी शोधावं लागणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments