फेमस

Bollywood Update ।शाहरुख खानला मुंबईतून काढून टाकण्याची झाली होती चर्चा

चक्क शाहरुख खानला मुंबईतून काढून टाकण्याची झाली होती चर्चा , ही होती शाहरुखची प्रतिक्रिया.

शाहरुख खानने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये खास ओळख मिळवली आहे. त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने बॉलीवूड इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत, याव्यतिरिक्त शाहरुख खानला काही वाईट अनुभवदेखील आले आहेत.

एक वेळेस खानला मुंबईतून हकलवून लावण्याच्या चर्चा समोर आल्या होत्या, अस शाहरुख खानने 2018 मध्ये फिल्मफेअर मॅगीजिनसाठी दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

फिल्ममेअरसोबतच्या चर्चेदरम्यान शाहरुख खानला विचारलं की त्यांच्याबद्दल कोणीतरी खूप वाईट गोष्टी बोलत आहे. यावर तो म्हणाल की ‘ऑथर अशोक बैंकर यांनी एकदा मला मुंबईतून काढून टाकले पाहिजे, असे लिहिले होते, कारण आम्ही अभिनेते येथे सर्व लोकांना धोक्यात आणत आहोत, असे त्यांना वाटले होते. तसेच चित्रपटातील शाहरुखचे काम आणि कथित अंडरवर्ल्ड डिलिंगमुळे लोक त्यांना मारण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि याचबरोबर काही निष्पाप दर्शकांनादेखील मारण्याचा प्रयत्न केला जात होता, अशा चर्चादेखील समोर आल्या होत्या.

शाहरुख खान पुढे म्हणाला की , कोणीतरी माझ्याबद्दल वाईट मत व्यक्त केले याचं मला अजिबात वाईट वाटत नाही, पण मला फक्त याच गोष्टीचं वाईट वाटलं की कोणी कुठे राहायचे आणि कुठे नाही हे ठरविण्याचा हक्क कुणालाही नाही आणि माझ्या बंगल्यासाठी एवढा खर्च केल्यावर आता मी मुंबई सोडून जाऊ शकत नाही.

शाहरुख खानच्या कामाबद्दल सांगायचे तर तो नुकताच दिग्दर्शक आनंद लिला यांच्या ‘zero’ या चित्रपटात अभिनेत्री कटरीना कॅफ आणि अनुष्का शर्मा यांच्या सोबत दिसला.
आता शाहरुख, दीपिका पादुकोण आणि जॉन इब्राहिम बरोबर ‘पठान’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. याव्यतिरिक्त तो दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या मल्टीस्टारर ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये दिसून येईल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments