फेमस

IPL 2021: धोनीचा विश्वासघात, विश्वासू खेळाडूच्या नावावर लाजिरवाणा विक्रम…

चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सच्या थरारक सामन्यात 18 धावांनी पराभव करत या मोसमात आपल्या विजयांची हॅटट्रिक पूर्ण केली आहे.

महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) ला एक हिरा मानला जातो. खेळाडूंची चाचणी करताना रोहित शर्मासारखा सलामीवीर, रवींद्र जडेजासारखा अष्टपैलू खेळाडू धोनीमुळे मिळाला. खेळाडुंना पारखण्यात धोनीवर विश्वास ठेवला जातो. IPL मध्ये धोनी आपल्या टीम चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super King) बरोबरही असे करत आहे.

धोनीने अशा एका खेळाडूची चाचणी करुन त्याला CSK मध्ये आणले आहे. हा युवा खेळाडू इंग्लंडचा सॅम करन आहे. गेल्या सीझनपासून करन IPL मध्ये सीएसकेकडून खेळत आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये करनने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे आणि म्हणूनच तो दोन्ही विभागात धोनीचा विश्वासू खेळाडू बनला होता, मात्र बुधवारी केकेआर सोबत झालेल्या सामन्यात करनकडून लाजिरवाणा विक्रम झाला.

CSK ने बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दोन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने 20 ओव्हरमध्ये तीन खेळाडू गमावून 220 धावांची मोठी धावसंख्या उभारली. सीएसकेच्या गोलंदाजांनी केकेआरच्या फलंदाजांनाही बरोबरीत रोखले, पण करनच्या एका ओव्हरने केकेआरच्या बाजूने वातावरण निर्माण केले.15ओव्हर नंतर केकेआरला 7 विकेट राखून 30 बॉलमध्ये 75 धावांची गरज होती. करनने एकाच ओव्हर मध्ये 30 धावा दिल्या. या आयपीएलमधील आतापर्यंतची सर्वात महागडी ओव्हर ठरली आहे.


येथून पुढे केकेआर जिंकण्याच्या शर्यतीत आला परंतू शेवटी संघ अपयशी ठरला आणि 18 धावांनी सामना गमावला. करनच्या या ओव्हरमध्ये पॅट कमिन्सने चांगलीच बॅटिंग केली. कमिन्स त्याच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो पण या सामन्यात त्याने सांगितले की तो फलंदाजीबरोबरही फासे फिरवू शकतो.

या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर कमिन्सने दोन धावा घेतल्या. यानंतर त्याने करनला सलग तीन षटकार मारले. पहिला षटकार करनच्या डोक्यावरून गेला. दुसरा षटकार स्क्वेअर लेगवर गेला आणि तिसरा षटकार एक्सट्रा कव्हरला गेला. यानंतर, कमिन्सने चौकार ठोकला आणि नंतर शेवटच्या चेंडूवर, आणखी एक षटकारासह 30 धावा केल्या.


या षटकानंतर केकेआरला 24 चेंडूत 45 धावांची आवश्यकता होती. कमिन्स शेवटपर्यंत टिकून राहिला परंतू तो आपल्या संघाला विजय मिळवू शकला नाही. कमिन्सने केवळ 34 चेंडूत नाबाद 66 धावा फटकावल्या. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि सहा षटकार ठोकले. सॅम करनने चार ओव्हरमध्ये 58 धावा दिल्या आणि या सामन्यात विकेट मिळवली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments