कारण

टास्क फोर्सचं म्हणणं Lockdown करा, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पॅकेजबद्दल काय?

महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन लागण्याचे संकेत दिसू लागले आहेत, सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातल्या टास्कफोर्ससोबत बैठक घेत आहेत.

Maharashtra lockdown update : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अनेक नेत्यांसह राज्यातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठकांचे सत्र सुरु केले आहे. (Chief Minister Uddhav Thackeray’s meeting with task force regarding lockdown)

राज्यातील आरोग्य आणि महत्त्वाची यंत्रणा थकली आहे, त्यामुळे राज्यात काही दिवस लॉकडाऊनची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत विचार मांडला होता. मात्र अनेक नेत्यांनी या गोष्टीला विरोध केला होता, अखेर राज्याच्या कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या टास्क फोर्सची निर्मिती केली आहे, त्यासोबत मुख्यमंत्री बैठक घेत आहेत.

लोकांचा जीव वाचणे महत्त्वाचे आहे. जर आता नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला तर राज्यातील विरोधी पक्षनेते त्याला विरोध करतील का असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेत्यांना सवाल केला आहे.

जर राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली तर गरिबांबाबत काय, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील आपली भूमिका मांडली होती. लॉकडाऊन लावल्यास गरिबांना मदत करणे गरजेचे असेल, त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनची घोषणा झाल्यास अनेकांना पॅकेज मिळणार का, असा सवालदेदखील अनेक क्षेत्रांतून विचारला जात आहे. (Chief Minister Uddhav Thackeray’s meeting with task force regarding lockdown)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments