फेमस

CM Uddhav Thackeray: आतापर्यंत विष्णूचे अवतार पाहिले होते पण आता हा विषाणू विविध अवतार घेऊन आलाय

CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज जनते बरोबर संवाद साधला. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने लॉकडाऊनचा धोका अजून टळलेला नाही असं त्यांनी सांगितलं. मध्ये आपण कोरोणावर मात करायला यशस्वी झालो होतो पण आता परिस्थिती पुन्हा एकदा बदलेली आहे.

कोरोना कोरोना क्या है? अस सगळे बोलत होते आणि आता कोरोनचा उद्रेक पुन्हा एकदा वाढला आहे. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. आता बदला काळ असा आला की पार्ट्या, आंदोलनं सर्व काही केलं.मी सांगत होतो थोडा धीर धरा कोणी ऐकला नाही.तज्ञांनी भिती व्यक्त केली होती ती आता खरी ठरू लागली आहे.आतापर्यंत विष्णूचे अवतार पाहिले होते पण आता हा विषाणू विविध अवतार घेऊन आलाय.

500 चाचण्यांची सेंटर उभारली आहेत, 50,000 चाचण्या दर दिवसाला होत आहेत.महाराष्ट्रात 75 हजार चाचण्या करण्याची क्षमता होती जी आता 1 लाख 82 हजार एवढी झाली आहे आणि आता ही क्षमता अडीच लाख करायची आहे.

मला माझा महाराष्ट्र प्यारा आहे मला विलन जरी ठरवलं तरी मला चालेल.जनतेशी काहीही लपवत नाहीये.लाॅकाऊनच्या मनस्थितीत सरकार नाही आहे एक-दोन दिवसात कडक निर्बंध संदर्भात तज्ञांशी संवाद साधून निर्णय घेणार.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments