आपलं शहर

Maharashtra Lockdown : पुढील 15 दिवस या गोष्टींची सूट, बाकी सगळं बंद…

7 कोटी गरिब दारिद्ररेषेखालील जनतेला 2 किलो तांदळासह 3 किलो गहू मोफत....

राज्यात उद्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलम 144 चे निर्देश दिले असून, उद्या रात्री 8 पासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. पुढील 15 दिवसांसाठी हे निर्बंध असून, सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा सुरू असणार. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची विदारक परिस्थिती जनतेसमोर मांडत कडक निर्बंध जाहीर केले. काय आहेत ते निर्बंध आपण पाहुयात..

मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी जीव वाचविणे आपल्या समोर महत्त्वाचे आहे असे सांगून, अनेक निर्बंध वाढवीत आहोत असे सांगितले. उद्या रात्री 8 वाजल्या पासून हे निर्बंध लागू करीत आहोत. तर इथून पुढे 15 दिवस संचार बंदी लागू करीत आहोत.

1. उद्या संध्याकाळी रात्री 8 पासून, ब्रेक द चेन तोडण्यासाठी आपण राज्यात कलम 144 लागू करीत आहोत.

2. अनावश्यक येणं जाणं बंद करीत आहोत.

3. हॉटेल, रेस्टॉरंटला पूर्वीप्रमाणे निर्बंध, पण पार्सल सेवा फक्त उपलब्ध.

4. आवश्यक सेवा, सर्व आस्थापना सुरू राहणार.

5. सकाळी 7 ते रात्री 8 आपण अत्यावश्यक सेवा सुरू ठेवणार आहोत.

6. आपण बस, रेल्वे सुरू ठेवत आहोत.

7. अत्यावश्यक सेवा सोडून सगळ काही उद्या रात्री 8 पासून बंद

8. रुग्णालय, लस उत्पादक, मास्क जंतुनाशक उत्पादक, कृषी जनावरे संबंधित दुकाने, रेल्वे, ऑटो, बँक, सेबी, दूरसंचार सेवा, पत्रकार, दूरसंचार सेवा, शीतगृह सुरू राहणार.

9. रस्त्यावरील खाद्य दुकाने चालू ठेवत आहोत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments