खूप काही

Corona vaccine: महराष्ट्रात एका दिवसात 3 लाख जणांना कोरोना लस

Corona vaccine: राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे राज्य सरकारने कोरोना लसीकरणाला वेग दिला आहे.राज्यात 1 एप्रिलला तब्बल 3 लाखांहून अधिक लोकांना लस (vaccination) देण्यात आली आहे.आरोग्यमंत्री ( health minister) राजेश टोपे यांनी ट्विट करत या लसीकरणाबाबत माहिती दिली आहे आणि त्यामुळे राज्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे.

दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. यासाठी दररोज तीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.लसीकरणाला वेग देऊन यापेक्षा दुप्पट उद्दिष्ट गाठण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

मुंबई आणि पुण्यात रेकॉर्ड ब्रेक लसीकरणाची नोंद केली आहे. महाराष्ट्रात 1 एप्रिल पासून 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात सुरूवात करण्यात आलेली आहे. 3295 केंद्राच्या माध्यमातून 3 लाखांहून अधिक लोकांना लसीकरण करण्यात आलं. पुणे जिल्ह्यात कळ एका दिवसात तब्बल 57 हजार जणांना लसिकरण करण्यात आलं. मुंबईत 50 हजार लोकांच लासीकरण करण्यात आलं.

महाराष्ट्रात देशभरातून सगळ्यात जास्त म्हणजे 65 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments