आपलं शहर

मुंबईत परिस्थिती बिघडली, मृतांचा खच पडण्याची भीती

बीएमसीच्या रुग्णालयात आयसीयूचे बेड्स शिल्लक नसल्याने रुग्णांना वेटिंगवर थांबायची वेळ आली आहे.

मुंबईत आता ऑक्सिजन कमी भासू लागली आहे, बांद्रा भाभा रुग्णालय, भगवती रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन तुटवडा जाणवला आहे, येथील रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे,अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

मुंबईच्या खासगी आणि शासकीय रुग्णालयांमधील ऑक्सिजन साठा संपत आला आहे. अनेक ठिकाणी icu बेड्सची कमतरता भासत आहे, बीएमसीच्या रुग्णालयात आयसीयूचे बेड्स शिल्लक नसल्याने रुग्णांना वेटिंगवर थांबायची वेळ आली आहे. अनेक वॉररूममध्ये icu बेड्स किंवा गंभीर रूग्णांसाठी बेड्सबद्दल कोणतीच अपडेट नसल्याने अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना चिंता व्यक्त करावी लागत आहे.(Corona worsens situation in Mumbai)

दुसरीकडे एअरपोर्टवरील कार्गो तसेच एअर कंट्रोल विभागातील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लसीकरण करण्याची मागणी वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबईतल्या अनेक रुग्णालयात रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा साठा आणि बेड्सची कमतरता भासत असल्याने इतर राज्यांसह पुण्यापेक्षा मुंबईतील स्थिती खराब होत चालल्याचे चित्र आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments