आपलं शहर

मुंबईत कोरोनाचा विळखा लहानग्यांनाही… 0 ते 9 वयोगटातील 6,892 जणांना कोरोनाची लागण…

मुंबईत जेष्ठांसह लहानग्यांनाही कोरोनाची लागण

मुंबईत कोरोनाची लक्षणे वाढत असताना एक धक्कादायक माहिती समोर येत आहे, ती म्हणजे मुंबईतील लहान मुलांनाही कोरोनाची लागण होत आहे. 55 टक्के मुलांना तर 45 टक्के मुलींमध्ये कोरोनाची लक्षणे अढळून आल्याचे चित्र समोर आले आहे. (Coronavirus infection in Mumbai, including seniors and minors)

मुंबईत कोरोनाचा झपाट्याने फैलाव होऊ लागला असून आतापर्यंत मोठ्या व्यक्तींना कोरोनाची लागण होत होता, आता तोच प्रसार लहान मुला-मुलींमध्येही दिसून येत आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार 0 ते 9 वयोगटातील अनेकजणांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. आतापर्यंत 0 ते 9 वयोगटातील 6,892 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

समोर आलेल्या आकडेवारीमध्ये मुलांचे 55 आणि मुलींचे 45 टक्के प्रमाण असल्याची माहिती समोर येत आहे. तर 10 ते 19 वयोगटातील एकूण करोना रुग्णबाधितांची संख्या 17,549 अशी आहे. त्यात मुलांचे प्रमाण 55 टक्के आणि मुलींचे प्रमाण 45 टक्के एवढे आहे.

या दोन्ही वयोगटातील एकूण मृत्यूचा आकडा अनुक्रमे 17 आणि 32 टक्के आहे. त्यामुळे कोरोनाला हरवण्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. (Coronavirus infection in children for seniors)

मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्णांचा वयोगट 578,4710 ते 59 वर्षातील आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार या वयोगटातील 78,471 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी, पुरुषांचे प्रमाण 43,107 असून महिलांचे प्रमाण 35,311असल्याचेही समोर आले आहे.10 ते 19 वर्षे वयोगटातील 17,549 रुग्णांमध्ये 9,140 मुले आणि 7,699 मुलींचा समावेश असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. (6,892 people in the age group of 0 to 9 are infected with corona in Mumbai.)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments