आपलं शहर

रेल्वे स्थानकावरही कोरोनाची तपासणी सुरू करण्यात आली आहे

सतत मुंबई व इतर ठिकाणाहून प्रवासी येत असल्याने खगरिया स्टेशन वर covid-19 ची तपासणी केली जाते.

सोमवारी दुपारी 01:51 वाजता खगरीया रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर 0251 नऊ कामाख्य एसी स्पेशल ट्रेन पोहोचली. लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते कामख्यपर्यंत जाणारी साप्ताहिक ऐसी ट्रेनमधून मुंबईचे मोठ्या प्रमाणात प्रवासी खगरीया रेल्वे स्टेशनवर उतरले.

या प्रवाशांची चौकशी केल्याने समजले की काही प्रवासी कामाला सुट्टी मिळाल्याने त्यांच्या घरी जात आहे तर काही प्रवासी उपचारानंतर मुंबईहून परत आले आहेत.ट्रेनमधून उतरलेल्या एका वृद्ध जोडप्याने सांगितले कि ते मुंबईवरून उपचार करून आले आहेत. ( COVID-19 test to be conducted at railway stations for passengers arriving from mumbai)

ट्रेनच्या दुसऱ्या डब्यातून बॅग घेऊन उतरलेल्या संतोष कुमार या प्रवासीला विचारल्यावर त्याने सांगितले की महिन्याच्या सुट्टीमुळे ते आपल्या घरी जाण्यासाठी परत आले आहेत. मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांबद्दल त्यांना विचारल्यावर त्यांनी असे उत्तर दिले की ते एका हॉस्पिटलमध्ये काम करतात. परंतु तिथे घाबरण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही. ते कोरोना रुग्णां पासून पूर्णपणे दूर होते.

05645 दादर एक्सप्रेस ट्रेन आठवड्यातील दोन दिवस रविवार व गुरुवार खगरीया स्टेशन वर येते. मुंबई मधून येणाऱ्या ट्रेनमधून जवळपास 50 लोक खगरिया स्टेशनवर उतरतात. त्याचबरोबर त्याच संख्येने लोक मुंबईला परत जाताना दिसतात. त्यामुळे या स्टेशनवर गर्दी दिसते.

सतत मुंबई व इतर ठिकाणाहून प्रवासी येत असल्याने स्टेशन वर covid-19 ची तपासणी करण्यासाठी एक वॉर्ड तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तेथे येणाऱ्या प्रवाश्यांची तपासणी केली जाते. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्या कारणामुळे सगळीकडे भीती पसरली आहे. त्यामुळे मुंबई किंवा इतर शहरातून आलेल्या लोकांची तपासणी करणं आवश्यक आहे. ज्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढणार नाही.

त्याचबरोबर आजूबाजूच्या इतर स्थानकांवर देखील तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार या व्यतिरिक्त मानसी, महेशकुंट आणि परराहा रेल्वे स्थानकांवरही कोरोनाची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments