आपलं शहर

1 मेपासून सर्वांना लस, मात्र सगळ्यांना लागू एकच अट

18 वर्षावरील नागरिकांना लसीकरणासाठीचे रजिस्ट्रेशन आजपासून सुरू..

कोरोनाच्या महामारीमुळे 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मिळणार असून हे लसीकरण एक मे पासून सुरू होणार आहे. परंतु लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केले तरच लस मिळणार.

रजिस्ट्रेशन 28 एप्रिल पासून सुरु होणार असून 18 ते 45 वर्षांपर्यंतचे नागरिक रजिस्ट्रेशन शिवाय लस येऊ शकत नाही. सध्या भारतामध्ये कोरोनासाठी दोन प्रकारच्या लस दिल्या जातात. एक कोवैक्सिन आणि दुसरी कोवीशील्ड. त्यामुळे ज्या लसीचा पहिला डोस घेतला जाईल त्याच लसीचा दुसरा डोस घ्यावा लागतो. जर पहिला डोस कोवीशील्डचा घेतला असेल तर दुसर डोस देखील कोवीशील्डचाच घ्यावा लागतो. त्यामुळे रजिस्ट्रेशन करणे महत्त्वाचे आहे.(COVID-19: Vaccination registration for all adults starts today)

लसीकरण करण्यासाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया काय असणार आहे ते जाणून घेऊ. सध्या रजिस्ट्रेशन च्या बाबतीत अनेक अफवा पसरत आहेत. हे रजिस्ट्रेशन वेब पोर्टलद्वारे करावे लागते. कोविन पोर्टल (https://selfregistration.cowin.gov.in/) यावर जाऊन लॉगिन करून रजिस्ट्रेशन करू शकतो. त्याचबरोबर आरोग्य सेतू ॲप द्वारे देखील रजिस्ट्रेशन करू शकतो. या रजिस्ट्रेशनची प्रोसेस आज संध्याकाळी चार वाजल्यापासून सुरू होणार आहे.

18 ते 45 वर्षावरील नागरिकांना रजिस्ट्रेशन ऑनलाइनच करावे लागेल. कारण या वर्गातील नागरिकांची संख्या जास्त असल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी रोखण्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनच करावे लागेल. परंतु 45 अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी सेंटरवर जाऊन रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध आहे.

या लिंक वर जाऊन आपला मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर एक ओटीपी येईल तो ओटीपी 180 सेकंदाच्या आत तिथे टाकावा लागेल. त्यानंतर सब्मिट या बटनावर क्लिक केल्यावर नवीन पान उघडेल त्यावर आपली पर्सनल डिटेल भरावी लागेल. ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक यापैकी कोणताही आयडी नंबर तिथे टाकू शकतो. त्यानंतर आपलं पूर्ण नाव जन्म तारीख आणि जेंडर टाकावे लागते. त्यानंतर आपल्या जवळपास जे व्हॅक्सिनेशन सेंटर उपलब्ध आहे ते निवडावे लागेल. जेव्हा आपला नंबर येणार तेव्हा जाऊन लस घ्यावी लागते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments