आपलं शहर

मुंबईत चार नव्या कोव्हिड केअर सेंटरची उभारणी, रुग्णांना मिळणार दिलासा…

कोरोनाच्या दुसऱ्या लाटीमुळे आरोग्य यंत्रणेत अनेक प्रकारची वाढ केली जात आहे.

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी सर्व आरोग्य यंत्रणांना केले आहे. त्यामुळे मुंबईमध्ये बीएमसीने कोरोना रुग्णांसाठी बेड वाढवण्याची तयारी सुरु केली आहे. मुंबईच्या अनेक ठिकाणी बेड्स उपलब्ध असावेत, यासाठी महापालिका सज्ज असून यासाठी नवीन चार कोव्हिड सेंटरची उभारणी केली जात आहे. (Establishment of four new Covid Care Centers in Mumbai will provide relief to patients)

मुंबईमध्ये आसपास 90 हजार कोरोनाचे रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लॉकाडऊनचा इशारा दिला आहे. त्यातच कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध व्हावेत, यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे.

त्यातलाच एक भाग म्हणून मुंबईमध्ये चार नवीन सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. हे कोव्हिड सेंटर एमएमआरडीए, सिडको, म्हाडा, पालिका यांच्या अंतर्गत उभे केले जाणार आहेत, जवळपास 5300 बेड्स यामुळे उपलब्ध होणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

कांजूरमार्गच्या एमएमआरडीए (MMRDA) भागात एक कोव्हिड सेंटर उभारणार आहे. तिथे तब्बल 2000 बेड्सची सोय होणार आहे, तर 200 आयसीयू बेड्सचे नियोजन या कोव्हिड सेंटरमध्ये केले जाणार आहे.

मालाडच्या रहेजा ग्राउंडवर सिडकोकडून (CIDCO) कोव्हिड केअर सेंटर उभारले जाणार आहे. यात 2000 बेड्स उपलब्ध होणार आहेत, तर 200 आयसीयू बेड्सची सोय इथल्या रुग्णांसाठी केली जाणार आहे.

मुंबईतल्या सोमय्या ग्राउंडवर म्हाडातर्फे (MHADA) कोव्हिड केअर सेंटर उभारले जाणार आहे. तिथे 1000 बेड्सची उपलब्धता होणार आहे, तर 200 आयसीयू बेड्सची सोय केली जाणार आहे.

मुंबईतल्या महालक्ष्मी ठिकाणी बीएमसीकडून (BMC) कोव्हिड केअर सेंटर उभारलं जाणार आहे, ज्यात 300 साधारण बेड्स तर 200 आयसीयू बेड्सची सोय असणार आहे.

या सगळ्यातून एकूण 5 हजार 300 साधारण, तर 800 आयसीयू नव्या बेड्सची उपलब्धता होणार असल्याचं किशोरी पेडणेकरांनी म्हटलं आहे. (four new CCC in Mumbai)

या चारही कोव्हिड सेंटरच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. मे महिन्याच्या मध्यापर्यंत ही कोव्हिड सेंटर मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्याचप्रमाणे वरळीतील कोव्हिड केअर सेंटर सुसज्ज असून हे कोव्हिड सेंटर लवकरच सुरू होणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. (Establishment of four new Covid Care Centers in Mumbai will provide relief to patients)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments