खूप काही

Suez canal | एव्हर गिव्हन जहाजाची सुटका, जगाचं अब्जावधींचं नुकसान वाचलं

एव्हर गिव्हन जहाजाला बाहेर काढण्यात मिळाले यश

इजिप्तमधील सुएझ कालव्यात गेल्या काही दिवसांपासून एव्हरग्रीन नावाचे महाकाय जहाज अडकले होते. हे जहाज 23 मार्चला सुएज कालव्यात अडकले होते. त्यामुळे आशियामधून युरोप आणि इतर देशांमध्ये जाणाऱ्या व्यापारी जहाजांची वाहतूक थांबली होती.

29 मार्चला पाण्यात भरती आल्यामुळे ते बाहेर काढण्यात आले. हे जहाज सात दिवसांनंतर बाहेर काढले. 18 मीटर खोलपर्यंत वाळू खोदून ते जहाज हलवण्यात आले.(Ever Given ship)

या कालव्यातून दिवसाला 50 पेक्षा जास्त जहाजांचे येणे – जाणे होत असते. कालव्यात जहाज अडकल्याने अनेक जहाजांनी अफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा मारून युरोपची वाट धरली आहे.

या जहाजात 9.6 अब्ज डॉलरचा माल अडकला होता. हे जहाज कालव्यात आडवे अडकल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दक्षिणेकडे सुमारे तीनशे मालवाहू जहाजांची मोठी रांग लागली होती.

जहाज अडकल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे. नाशिक आणि अन्य ठिकाणची फळे युरोपमध्ये जात असल्याने कंन्टेनर अनेक दिवसांपासून तिथेच उभे आहेत. त्यामुळे फळांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

हे जहाज बाहेर काढण्यासाठी अनेक लोकांना खूप कष्ट करावे लागले. जहाजावर 25 कर्मचारी होते. त्यामुळे त्यांनी सात दिवस या जहाजावर थांबून वेगवेगळ्या पद्धतीने जहाज बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हे जहाज बाहेर काढण्यात यश आले असून हजारो डॉलरचे नुकसान होण्यापासून थांबले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments