खूप काही

ज्यांनी हजारोंना वाचवलं, त्याच बाप-लेकाचा घेतला कोरोनाने जीव

डॉक्टर पितापुत्राचा कोरोनाने मृत्यू...

कोरोनाचे संकट आल्यापासून अनेक कोरोन रुग्णांचा जीव वाचवता वाचवता डॉ. नागेंद्र मिश्रा आणि डॉ. सुरज मिश्रा या दोन डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही घटना कल्याणमध्ये घडली असून विशेष म्हणजे हे दोन डॉक्टर एकाच कुटुंबातील होते. एकापाठोपाठ काही तासाच्या फरकाने या पितापुत्रांचा मृत्यू झाला. या डॉक्टरांचे संपूर्ण कुटुंबच करोनाने बाधित आहे.

डॉ. मिश्रा यांनी खूपकाळ रुग्ण सेवा केली आहे. यांचे टिटवाळामधील खडवली परिसरात २२ वर्षोपासून क्लिनिक आहे. त्याचबरोबर भिवंडीच्या बापगाव भागात देखील यांचे क्लिनिक आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक लोकांना अनेक प्रकारे मदत केली आहे. अनेक रुग्णांना कोरोनातून बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला आहे. डॉ. नागेंद्र मिश्रा यांच्या बरोबर त्यांचा मुलगा डॉ. सुरज यांनी देखील रुग्णसेवेत स्वतःला वाहून दिले.( Father and son, both doctors, die of Covid in Maharashtra)

त्यांनी अनेक रुग्णांवर मोफत उपचार केला आहे. त्याचबरोबर अनेक प्रकारे गरजूना मदतीचा हात पुढे केला. काही दिवस दोघांना ताप येत होता त्यामुळे त्यांनी कोरोनाची टेस्ट करून घेतली होती. त्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. नागेंद्र यांनी कोरोनाची पहिली लास देखील घेतली होती. परंतु दुसरी लस घेण्यापूर्वीच ते कोरोनाच्या विळख्यात अडकले. त्यांना बेडसाठी वणवण करावी लागली.तरी देखील त्यांना बेड मिळाला नाही. त्यामुळे नागेंद्र याना ठाण्यात वेदांत रुग्णालय आणि सुरज यांना गोरेगावमधील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

नागेंद्र यांच्या पत्नीचा कोरोना रिपोर्ट देखील पॉसिटीव्ह आला. परंतु त्यांची परिस्थिती जास्त वाईट नसल्याने त्यांनी स्वतःला व त्यांच्या मोठ्या मुलाला घरीच लॉक करून घेतले. या दरम्यान नागेंद्र आणि सुरज यांची परिस्थिती जास्त बिघडली आणि १५ एप्रिलला रात्री डॉ. सुरज यांचे निधन झाले तर काही तासातच डॉ. नागेंद्र यांचे देखील निधन झाले. ज्या दिवशी डॉ. नागेंद्र यांचे निधन झाले त्याच दॆवशी त्यांचा वाढदिवस होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments