आपलं शहर

Mumbai Lockdown : मुंबईहून उत्तर भारतातकडे गाड्या रवाना, मुंबई रिकामी होण्यास सुरुवात?

लॉकडाऊन लागणार या भीतीने मुंबईतील अनेक परप्रांतियांनी गावी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई – राज्य सरकारने लागू केलेल्या नियमावलीमुळे सामान्य मुंबईकरांना पुन्हा लॉकडाऊनची भीती सतावत आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांमुळे अनेकजण संभ्रमात आहेत. अजून कठोर नियम लागू केले जाऊ शकतात. याचा परिणाम काही दिवसांपासून दिसून येत आहे. गेल्या एक आठवड्यापासून उत्तर भारतातकडे जाणाऱ्या गाड्यांचे बुकिंग सुरु आहे. ही बुकिंग पंचायत निवडणुका किंवा सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या नाहीत, तर लॉकडाऊनच्या भीतीने गावी जाणाऱ्या आहेत. (Many trains leave Mumbai for other states)

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. आता फक्त आरक्षित तिकीटधारकांना प्रवास करण्याची मुभा दिली जात आहे. याआधी जे प्रवासी जनरल आरक्षणातून प्रवास करत होते, त्यांनादेखील आता सेकंड सिटींग श्रेणीमधील तिकीट दिलं जात आहे. याच्याव्यतिरिक्त प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये, यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटांची रक्कम ५० रुपये केली आहे.

रेल्वे गाड्यांची संख्या वाढवली

गेल्या 15 दिवसांपासून प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेमार्फत विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. जरी कोरोनापूर्वी चालणार्‍या गाड्यांच्या तुलनेत सध्या निम्म्या गाड्या धावत असल्या तरी त्यात भर म्हणून अजून गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.

मुंबईतील परप्रांतिय घरी परतले

कोरोनाचे वाढते संक्रमण आणि लॉकडाऊन होण्याची शक्यता लक्षात घेता वसई औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार आता आपआपल्या गावी परतू लागले आहेत. 2020 सारखी परिस्थिती घडण्याआधी गावी पोहोचण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे. मात्र अचानक कामगार आपल्या गावी नघू लागल्याने अनेक कंपनी मालकांची चिंता वाढली आहे.

कामगार गावी परतत असल्यामुळे कंपनी मालकांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. कामगार घाबरून गेले तर कंपनीला कुलूपबंद करावे लागेल, अशी त्यांची भीती आहे. स्टील व्यापारी पुन्हा एकदा मंदीच्या भोवर्यात अडकले आहेत. वसईत 4 हजारहून अधिक कंपन्या आहेत. येथे 40 हजाराहून अधिक मजूर काम करतात. (Many trains leave Mumbai for other states)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments