खूप काही

तिकडे डॉलर्स वाढले, इकडे सोने घटले, वाचा थेट संबंध काय?

मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरात घट तर आज चांदीच्या दरात वाढ ..

आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर्सच्या किंमतीत वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीत घट पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 940 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 940 रुपये इतका आहे.

100 ग्राम सोन्याच्या दरात 100 रुपयांची घट झाली असून 10 ग्राम सोन्याच्या दरात 10 रुपयांची घट झाली आहे. गुडरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने होणारी घसरण पाहता येत्या काळातही थोड्याफार प्रमाणात दर घटण्याचे हे सत्र असंच सुरू राहणार असल्याची माहिती तज्ज्ञांकडून मिळाली आहे. (gold silver rate today in mumbai)

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 594 रुपये
8 ग्राम 36 हजार 752 रुपये
10 ग्राम 45 हजार 940 रुपये
100 ग्राम 4 लाख 59 हजार 400 रुपये

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 494 रुपये
8 ग्राम 35 हजार 952 रुपये
10 ग्राम 44 हजार 940 रुपये
100 ग्राम 4 लाख 49 हजार 400 रुपये

आज चांदीच्या दरात देखील वाढ झाली असून मुंबईमधील चांदीचा दर प्रतिकिलो 68,800 रुपये आहे. 1 किलो चांदीच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आहे. 28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव 67,500 होता, 31 मार्च ला तो भाव 65,500 रूपये इतका झाला.

चांदीचे दर
1 ग्राम 68.80 रुपये
8 ग्राम 550.40 रुपये
10 ग्राम 688 रुपये
100 ग्राम 6 हजार 880 रुपये
1 किलो 68 हजार 800 रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments