खूप काही

सोन्याचे दर ‘जैसे थे’ तर चांदीच्या दरात वाढ, लॉकडाऊनचा सोन्या-चांदीवर परिणाम

सोन्या-चांदीचे दर वाढण्याची शक्यता.

आज मुंबई मधील सोन्याचा दर 44 हजार 940 रुपये आहे. आज सोन्याच्या दरात वाढ किंवा घसरण झालेली दिसून येत नाही. सोन्याच्या किंमतीत काहीच बदल झालेला नाही.

एप्रिल महिन्यात सोन्याचा दर 8 टक्क्यांनी म्हणजे 3 हजार 600 रुपयांनी वाढला आहे. त्याचबरोबर या महिन्यात चांदीच्या भावात देखील 11 टक्के म्हणजेच 5 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. येणाऱ्या काळात सोन्या-चांदीचे दर आणखीन वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.गुडरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे. (gold silver rate today in mumbai)

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 594 रुपये
8 ग्राम 36 हजार 752 रुपये
10 ग्राम 45 हजार 940 रुपये
100 ग्राम 4 लाख 59 हजार 400 रुपये

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 494 रुपये
8 ग्राम 35 हजार 952 रुपये
10 ग्राम 44 हजार 940 रुपये
100 ग्राम 4 लाख 49 हजार 400 रुपये

आज चांदीच्या दरात वाढ झाली असून मुंबईमधील चांदीचा दर प्रतिकिलो 68,750 रुपये आहे. 1 किलो चांदीच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. 28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव 67,500 होता, 31 मार्च ला तो भाव 65,500 रूपये इतका झाला.

चांदीचे दर
1 ग्राम 68.75 रुपये
8 ग्राम 550 रुपये
10 ग्राम 687.50 रुपये
100 ग्राम 6 हजार 875 रुपये
1 किलो 68 हजार 750 रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments