खूप काही

Gold silver rate | सोन्याच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर

काही दिवस सलग सोन्याचे दर कमी होत होते. परंतु आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

भारतीयांना आजही सोन्याचे आणि चांदीचे आकर्षण कायम आहे. हौस म्हणून किंवा प्रतिष्ठा म्हणून सोने खरेदी करणारे आजवर अनेक आहेत. चांगला परतावा देणारी गुंतवणूक म्हणून या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे दिवसेंदिवस सोने आणि चांदी यांच्या दरात वाढ घसरण होत असते.

काही दिवस सलग सोन्याचे दर कमी होत होते. परंतु आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 43 हजार 910 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 910 रुपये इतका आहे. गोडरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे. 10 ग्राम सोन्यामध्ये 10 रुपयांची वाढ झाली असून 100 ग्राम सोन्याच्या किंमतीत 100 रुपयांनी वाढ झाली आहे.(gold silver rate today in mumbai)

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 391 रुपये
8 ग्राम 35 हजार 128 रुपये
10 ग्राम 43 हजार 910 रुपये
100 ग्राम 4 लाख 39 हजार 100 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 491 रुपये
8 ग्राम 35 हजार 928 रुपये
10 ग्राम 44 हजार 910 रुपये
100 ग्राम 4 लाख 49 हजार 100 रुपये

चांदीच्या दरात दिवसेंदिवस घट पाहायला मिळत आहे. मुंबईमधील चांदीचा दर प्रतीकिलो 65 हजार 500 रुपये असून आजच्या चांदीच्या दरात वाढ किंवा घट झालेली नाही.

चांदीचे दर
1 ग्राम 65 रुपये
8 ग्राम 520 रुपये
10 ग्राम 650 रुपये
100 ग्राम 6 हजार 500 रुपये
1 किलो 65 हजार रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments