खूप काही

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोन्याचे दर वाढण्याची शक्यता; वाचा आजचे सोन्या चांदीचे दर

सोन्याचे दर वाढले, चांदीच्या दरात घट

एप्रिल महिन्यात सोन्याचे दर सलग वाढताना दिसत आहेत. मिनी लॉकडाऊनचा देखील सोन्या चांदीच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी संस्कृतीमध्ये सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. गुढी पाडव्याला सोने खरेदी हे शुभ मानले जाते. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 570 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 570 रुपये इतका आहे. 100 ग्राम सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्राम सोन्याच्या दरात 10 रुपयांची वाढ झाली आहे. आता हे दर गुढीपाडव्याच्या दिवशी आणखी वाढणार अशी शक्यता दर्शवली आहे. गुडरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे. (gold silver rate today in mumbai)

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 457 रुपये
8 ग्राम 35 हजार 656 रुपये
10 ग्राम 44 हजार 570 रुपये
100 ग्राम 4 लाख 45 हजार 700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 557 रुपये
8 ग्राम 36 हजार 456 रुपये
10 ग्राम 45 हजार 570 रुपये
100 ग्राम 4 लाख 55 हजार 700 रुपये

चांदीच्या दरात घट झाली असून 1 किलो चांदीच्या दरात 500 रुपयांची घट झालेली दिसून येते . मुंबईमधील चांदीचा दर प्रतीकिलो 67 हजार रुपये आहे. 28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव 67,500 रुपये होता, 31 मार्चला तो भाव 65,500 रूपये इतका झाला.

चांदीचे दर
1 ग्राम 67 रुपये
8 ग्राम 536 रुपये
10 ग्राम 670 रुपये
100 ग्राम 6 हजार 700 रुपये
1 किलो 67 हजार रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments