खूप काही

लॉकडाऊनमध्येही सोने-चांदी झाले स्वस्त… दरांमध्ये घसरण होण्याचं कारण काय

सोन्या चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

भारत सर्वाधिक सोन्याची आयात निर्यात करणारा देश आहे. त्याचबरोबर भारतात गुंतवणुकीचा योग्य पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. कोरोनाचे संकट, लॉकडाऊन आणि इतर नियम यांच्यामुळे अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लोक गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोने घेत आहेत.

आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. मुंबईमधील 22 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 980 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 980 रुपये इतका आहे. 100 ग्राम सोन्याच्या दरात 900 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्राम सोन्याच्या दरात 90 रुपयांची वाढ झाली आहे. गुडरिटन्सच्या माध्यमातून या दरांची माहिती घेण्यात आली आहे. (gold silver rate today in mumbai)

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 598 रुपये
8 ग्राम 36 हजार 784 रुपये
10 ग्राम 45 हजार 980 रुपये
100 ग्राम 4 लाख 59 हजार 800 रुपये

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 498 रुपये
8 ग्राम 35 हजार 984 रुपये
10 ग्राम 44 हजार 980 रुपये
100 ग्राम 4 लाख 49 हजार 800 रुपये

आज चांदीच्या दरात घट झाली असून मुंबईमधील चांदीचा दर प्रतिकिलो 68,600 रुपये आहे. 1किलो चांदीच्या दरात 600 रुपयांची घट झाली आहे. 28 फेब्रुवारीला एक किलो चांदीचा भाव 67,500 होता, 31 मार्च ला तो भाव 65,500 रूपये इतका झाला.

चांदीचे दर
1 ग्राम 68.60 रुपये
8 ग्राम 548.80 रुपये
10 ग्राम 686 रुपये
100 ग्राम 6 हजार 860 रुपये
1 किलो 68 हजार 600 रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments