आपलं शहर

वीकेंड लॉकडाऊनमुळे मुंबईकरांसाठी गुड न्यूज, लॉकाडाऊन लागल्यास…

मुंबईसह महाराष्ट्रामध्ये वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला होता, त्यामुळे अनेकठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं चित्र समोर येत आहे.

शुक्रवारी, 9 एप्रिलच्या संध्याकाळपासून वीकेंड लॉकडाऊनची सुरुवात झाली होती, ते सोमवारी सकाळपर्यंत हा लॉकडाऊन होता. यादरम्यान अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले होते, त्यामुळेच मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. (Weekend lockdown reduced the number of corona patients)

शनिवार आणि रविवारच्या लॉकडाऊननंतर मुंबईत कोरोना संसर्गाची गती अचानक कमी झाली आहे. बर्‍याच दिवसानंतर 7 हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 6905 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे तर 43 कोरोना ग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत समोर आलेल्या आकडेवारीनुसार बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणदेखील मोठ्याप्रमाणात आहे,

एकीकडे 6905 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 5,27,119 इतकी झाली आहे. मंबईत आतापर्यंत 12,060 नागरिकांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

त्याच वेळी, 9037 कोरोनाग्रस्तांनी कोरोनावर मात करून घरी परतल्याची माहिती आहे. मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये घट झाल्याने आरोग्य विभाात समाधान व्यक्त केले जात आहे. मुंबईत सध्या 90,267 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती बीएमसीच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Good news for Mumbaikars due to weekend lockdown)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments