खूप काही

NEET-PG च्या परीक्षेबाबत मोठा निर्णय, अनेकांचं नुकसान…

NEET-PG परीक्षा 18 एप्रिल 2021 ला होणार होती परंतु कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता ही परीक्षा रद्द करण्यात आली.

देशभरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ( NEET-PG) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धनयांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे.

ही परीक्षा 18 एप्रिल 2021 ला होणार होती. परंतु कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता ही परीक्षा रद्द केली आहे. NEET PG या परीक्षेसाठी केवळ तीन दिवस बाकी होते. या परीक्षेत दोन लाखापेक्षा जास्त मेडिकल शाखेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. परंतु ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थी आता नवीन तारीखेची वाट बघत आहेत.(government postpones NEET-PG 2021 exam)

अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर #postponeneetpg हे अभियान सुरु केले होते. त्याचबरोबर ही परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी देखील अनेकदा केली होती. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन या संस्थेने परीक्षा रद्द करावी यासाठी विद्यार्थ्यांनी संस्थेला पत्र देखील पाठवले होते. तरीसुद्धा संस्थेने 14 एप्रिलला NEET-PG विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट जारी केले होते. ही परीक्षा रद्द करावी, यासाठी काही विद्यार्थ्यांनी कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता वर्तवली होती. परंतु आता ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments