खूप काही

मुंबईत कोरोनाचा हाहाकार, या तारखेपर्यंत असणार मुंबईतील सर्व बीच पर्यटनासाठी बंद…

वाढत्या कोरोना प्रकरणांमध्ये गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील सर्व समुद्र किनारे 30 एप्रिलपर्यंत पर्यटनासाठी बंद असणार आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ३० एप्रिलपर्यंत सर्व समुद्र किनारे बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. नवी मुंबईतील सर्व दुकानेदेखील बंद ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अचानक सर्व दुकाने बंद केल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे, लॉकडाऊन शनिवार आणि रविवारी असूनही आज पासूनच कारवाई का, असा सवाल व्यापाऱ्यांकडून विचारला जात आहे.

बीएमसीकडून मुख्यालय आणि शहरातील प्रमुख कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सामान्य नागरिकांना प्रवेश बंदी केली आहे. ज्या नागरिाकांना बाहेर ठिकाणी प्रवेश करायचा आहे, त्यांना 48 तासांमध्ये आरटीपिसीआरची चाचणी करणे बंधनकारक असणार आहे.

यामध्ये असे म्हटले आहे की नगराध्यक्षांद्वारे दक्षिण मुंबई मुख्यालय आणि इतर कार्यालयांमध्ये प्रवेश पत्र स्विकार करण्यास सांगितले आहे. त्याना स्टाफ बरोबर समोरा – समोर बसून ऑनलाईन बैठक करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईतल्या अनेक सार्वजनिक ठिकाणी आणि बीचवर मुंबई पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे, विनाकारन फिरणाऱ्यांना चौकशीकरून कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मुंबईच्या अनेक ठिकाणी पोलिसांकडून कलम 144 लागू करण्यात आला आहे. हे कलम 30 एप्रिलपर्यंत सकाळी सात ते रात्री आठच्या दरम्यान लावणार असल्याची माहिती समोर येत आहे.

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार आठवडयात वर्किंग डेच्या दिवशी रात्री आठनंतर कर्फ्यू लावला गेला आहे, तर विकेंडला (शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत) लॉकडाऊन लागू असेल. हे आदेश पोलीस आयुक्त एस चैतन्य यांनी जाहीर केले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments