फेमस

IPL 2021: हर्षल पटेलने मुंबई इंडियन्सविरुद्ध रचला एक नवा इतिहास…

हर्षल पटेलने मुंबई इंडियन्सविरूद्ध फक्त सर्वाधिक विकेटचा नही, तर रोहित शर्माचा 12 वर्षांचा विक्रमही मोडला.

IPL 2021 : हर्षल पटेल 2012 ते 2017 पर्यंत आरसीबीच्या टीममध्ये खेळत होता, त्यानंतर त्याने 2018 ते 2020 पर्यंत दिल्ली कॅपिटलसाठी उत्कृष्ट कामगिरी केली. आता 2021 मध्ये हर्षलने पुन्हा बंगलुरुमध्ये घरवापसी केली आहे. IPLच्या 14 व्या हंगामाच्या सुरुवातीलाच हर्षल सर्वोत्कृष्ठ कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या पहिल्या सामन्यात हर्षल पटेलने इतिहास रचला. त्याने मुंबई इंडियन्सविरूद्ध सर्वाधिक विकेट्स (कोणत्याही एका सामन्यात) विक्रम केला नाही तर रोहित शर्माचा 12 वर्षाचा विक्रमही मोडला. हर्षल पटेल मुंबई इंडियन्सविरुद्ध 5 विकेट घेणारा पहिला गोलंदाज बनला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Harshal Patel (@harshalvp23)

हर्षल पटेल हा 2012 ते 2017 पर्यंत आरसीबीच्या टीममध्ये होता यानंतर तो 2018 ते 2020 या काळात दिल्ली कॅपिटलसाठी खेळला. आयपीएलचा 14वे सत्र सुरू होण्यापूर्वी आरसीबीने त्याचा दिल्लीतून ट्रेड केला आणि त्याने टीम मॅनेजमेंटच्या निर्णयाला योग्य ते सिद्ध केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Harshal Patel (@harshalvp23)


पुन्हा आरसीबी हाऊस मध्ये परत येताच हर्षलने त्याचे टॅलेन्ट दाखवले. हर्षलने 4 ओवर मध्ये 27 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. आयपीएलमधील कोणत्याही गोलंदाजाची मुंबई इंडियन्सविरुद्धची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments