खूप काही

IPL 2021:मिनी लाॅकडाऊनचा IPL वर कोणताही परिणाम होणार नाही

महाराष्ट्रात मिनी लाॅकडाऊन होऊनही मुंबईत IPL 2021 वर कोणतेही नियम लागू होणार नाहीत .

राज्यात कोविड -19 विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी रविवारी दुपारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महाराष्ट्र सरकारने संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला परंतु सरकारच्या ताज्या आदेशानंतरही इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या कार्यावर याचा परिणाम होणार नाही, असा पुनरुच्चार मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) केला आहे.

रविवारी सायंकाळी महाराष्ट्र सरकारने राज्यात आंशिक लॉकडाउनचे आदेश दिले असले तरीही त्यानंतर आयपीएल 2021 मध्ये मुंबईत होणार्‍या सामन्यांसाठी एमसीएकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे .

आयपीएल 2021 ची सुरुवात 9 एप्रिलपासून होईल.

क्रिकबझच्या अहवालानुसार, एमसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नगरपालिका आयुक्तांनी फोन करून लॉकडाऊन नियमांचा आयपीएल सामन्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे संघटनेला आश्वासन दिले आहे .तथापि, अन्य क्रिकेट क्रिया त्वरित थांबवाव्या लागतील असे सांगितले आहे ,तसेच आयपीएल संघांचा सराव आणि बायो बबलचा भाग असलेल्या कोणत्याही क्रिकेट क्रियाकल्पांना अखंडितपणे परवानगी दिली जाईल असे एमसीए ने सांगितले.

आयपीएलचे सामने मुंबईत 10 ते 24 एप्रिल दरम्यान होणार आहेत.10 एप्रिलला (शनिवार) चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटलमध्ये सामना आहे. आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल, पंजाब किंग्ज, रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या सहा संघात वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments