फेमस

IPL 2021 : आकाश चोप्राच्या मते IPL च्या 14 व्या हंगामात ‘ही’ टीम बाजी मारणार

IPL च्या 14 व्या सत्रात हिच टीम ठरणार सर्वात धमाकेदार, आकाश चोप्रा यांनी व्यक्त केले आपले मत .

9 एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPLचे 14 वे सत्र सुरू होणार आहे. हि ट्रॉफी जिंकण्यासाठी 8 संघ सज्ज झालेआहेत. या सत्रात कोणता संघ सर्वात जबरदस्त सिद्ध होईल याबद्दल भारताचे माजी सलामीवीर आणि क्रिकेट भाष्यकार आकाश चोप्रा यांनी सांगितले आहे.

आकाश चोप्रा यांनी यूट्यूबवर एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, ‘यावेळी मी मुंबई इंडियन्सवर पैज लावणार आहे, कारण रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉकसारखे उत्तम सलामीवीर मुंबई इंडियन्सच्या संघात आहेत.

मुंबई इंडियन्सच्या सामर्थ्याविषयी बोलताना आकाश चोप्रा म्हणाले की, त्वरित फलंदाजीत तज्ज्ञ असलेल्या ख्रिस लिनसारखा खेळाडू मुंबई इंडियन्सचा राखीव सलामीवीर आहे. आकाश चोप्राच्या म्हणण्यानुसार ईशान किशनला सलामीला संधी दिल्यास मुंबईचे सलामी संयोजन खूप धमाकेदार ठरेल.

9 एप्रिलला आहे मुंबई इंडियन्सचा पहिला सामना

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स 9 एप्रिल रोजी चेन्नई येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. 2019 मध्ये कोविड -19 च्या साथीमुळे युएईमध्ये खेळलेल्या स्पर्धेतही मुंबई इंडियन्सने विजेतेपद जिंकले होते .

ख्रिस लिन मोठ्या जबाबदारीसाठी सज्ज

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईने संघातील महत्त्वाचे खेळाडू कायम राखले असून हे त्याच्या वर्चस्वाचे मुख्य कारण आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक सारख्या सलामीवीरांसह फलंदाजी ही मुंबईची मजबूत बाजू आहे. गरज भासल्यास ऑस्ट्रेलियाचा ख्रिस लिनही जबाबदारी स्वीकारण्यास तयार असेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments