फेमस

IPL 2021: 200 वा सामना खेळल्यानंतर धोनीला झाली म्हातारपणाची जाणीव, म्हणाला…

पंजाब किंग्जला पराभूत केल्यानंतर धोनीला आपल्या म्हातारपणाची जाणीव झाली.

IPL 2021 मध्ये पंजाब किंग्सचा पराभव केल्यानंतर CSK चा कर्णधार एम.एस.धोनी (M. S. Dhoni) म्हणाला की, आता तो म्हातारा झाला असल्याची त्याला जाणीव होऊ लागली आहे.

धोनी असे का म्हणाला? या मागे काय कारण आहे ? हे आपण जाणून घेऊच परंतु त्याआधी, धोनीच्या संघाने म्हणजेच CSK ने पंजाब किंग्ज विरूद्ध मुंबईच्या वानखेडे मैदानावर कसा जबरदस्त सामना खेळला हे जाणून घेणे आवश्यक आहे .

मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात एम.एस.धोनीने टॉस जिंकून पंजाब किंग्जला प्रथम फलंदाजीस आणले. पंजाबची फलंदाजी इतकी काही नव्हती, परिणामी ते 20 ओवरमध्ये केवळ 106 धावा करू शकले. त्याला प्रत्युत्तर म्हणून चेन्नई सुपर किंग्ज (CSK)ने 4 गडी गमावून एकूण 107 धावा मिळवल्या आणि सामना जिंकला ,ज्याचा नायक  हा वेगवान गोलंदाज दीपक चहर ठरला

धोनी ने आपल्या 200 व्या सामन्यावर विजयाची छाप सोडली.

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम.एस.धोनीचा हा 200 वा सामना होता, त्यामुळे पंजाब किंग्जवरील विजयाचे महत्त्व आणखीनच वाढले. CSK साठी 200 सामने खेळणारा धोनी हा पहिला खेळाडू आहे. त्याचबरोबर, कोणत्याही एका फ्रेंचायझीसाठी इतके सामने खेळणारा विराट कोहलीनंतरचा तो दुसरा खेळाडू आहे. धोनीच्या 200 व्या सामन्यात विजयावर शिक्कामोर्तब तर केलाच पण त्याची फलंदाजी पाहण्याची आशा मात्र अपुरी राहिली.

200वा सामना झाल्यानंतर धोनीला आपल्या म्हातारपणाची  जाणीव झाली.

धोनीला जेव्हा त्याच्या आतापर्यंत च्या क्रिकेट प्रवासाबद्दल विचारले गेले तेव्हा हसुन तो म्हणाला की , “मी आता म्हातारा झालो आहे .” मग ते म्हणाले, “हा खरोखर एक लांब प्रवास होता जो 2008 पासून सुरू झाला. या प्रवासात बर्रशरेच चढ-उतार आले पण भारताव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेत,दुबईमध्ये सगळीकडे खेळायला मजा आली. एकंदरीत संपूर्ण प्रवास मजेशीर होता. ”

 

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments