फेमस

IPL 2021 KKR Vs MI । राहुल चहर ने केले कॅप्टन रोहित शर्माचे कौतुक

सामना संपल्यानंतर राहुलने केले आपल्या संघाच्या कर्णधाराचे भरभरून कौतुक

इंडियन प्रीमियर लीग (IPL)2021 च्या पाचव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध 10 धावांनी पराभूत झाला.
मुंबई इंडियन्सच्या राहुलने केकेआरच्या शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, इयन मॉर्गन आणि नितीश राणा यांना बाद करुन मुंबई इंडियन्सला सामन्यात परत आणले. या सामन्यात फिरकीपटू राहुल चहरला सामनावीर म्हणून निवडले गेले त्यानंतर सामन्याबद्दल बोलताना राहुलने कर्णधार रोहित शर्माचे भरपूर कौतुक केले.

सामना संपल्यानंतर राहुल चहर म्हणाले की , ‘आमच्यावर दबाव होता कारण त्यांनी चांगली सुरुवात केली होती आणि एक फिरकी गोलंदाज म्हणून मला ही सामन्यात पुनरागमन करायचे होते पण मला माझ्या क्षमतेवर विश्वास होता कारण आता मी 2-3 वर्ष आयपीएल खेळत आहे’. यामुळे चहरने
केकेआर च्या त्रिपाठी ची विकेट घेतली.
त्याचबरोबर शुभमन गिलला देखील चांगले ओळखत असल्याने, चहर यांना माहित होत की 90 किमी / तासाच्या वेगाने फिरकी चेंडू टाकणे हे त्यांचे सामर्थ्य आहे आणि शुभमन त्यांच्या चेंडूवर लागोपाठ मोठा फटका खेळू शकत नाही अशा शैलीने त्यांनी सामना जिंकला.

राहूल पुढे म्हणाला, माझा आत्मविश्वास बर्‍याच वेळा कमी होतो, परंतु रोहित शर्मा माझ्यावर विश्वास दाखवतात, ज्यामुळे माझा आत्मविश्वास वाढतो. या वेळेस मला वाटले की नितीश असा शॉट खेळेल, म्हणून मी फ्लिपची बाहेरील बाजू ठेवली असे तो म्हणाला.

जरी आपला सीझन चांगला गेला नाही, तरीही मुंबई इंडियन्स आमची काळजी घेतात आणि म्हणूनच हा एक खास फ्रँचायझी संघ आहे, असे म्हणत राहुल ने आपल्या संघाचे कौतुक केले .

केकेआर (KKR)ने टाॅस जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. आंद्रे रसेलने पाच गडी बाद केले आणि मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ 152 धावांत संपुष्टात आला. प्रत्युत्तरादाखल केकेआरची धावसंख्या एकाच वेळी 14.5 ओवरमध्ये तीन विकेट आणि 122 धावा होती. केकेआरला 31 बॉलमध्ये सात विकेट शिल्लक असताना 31 धावांची गरज होती. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी केकेआरच्या फलंदाजांविरूद्ध कडक गोलंदाजी करत ते आपले लक्ष्य गाठण्यासाठी मागे पडले.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments