IPL 2021 : Rohit Sharma : दुसरा सामना हारल्यानंतर रोहित शर्माने सांगितलं फिल्डिंग न करण्याचं कारण
दिल्ली विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने का केली नाही फिल्डिंग?

दिल्ली कॅपिटल जिंकली. मुंबईविरुद्ध सलग पाच सामने गमावल्यानंतर अखेर दिल्लीकरांना दिल-दिल-दिल्ली म्हणायची संधी मिळाली. पहिल्या चार सामन्यात मुंबईचा हा दुसरा पराभव आहे.
चेपाक येथे झालेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पॉवरप्लेमध्येही बरीच धमाकेदार कामगिरी केली. पण जेव्हा अमित मिश्राने गोलंदाजी करण्यास सुरवात केली तेव्हा सर्व खेळ उलटला आणि मुंबईचा संघ 20 ओव्हर मध्ये फक्त 137 धावा जोडू शकला.
मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माने सर्वाधिक 44 धावा केल्या. ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवने 26 आणि 24 धावांचे योगदान दिले तर जयंत यादवने लोअर आॅर्डर ने मौल्यवान 23 धावांची भागीदारी केली. दिल्लीकडून अमित मिश्राने सर्वाधिक चार विकेट घेतले. प्रत्युत्तरादाखल दिल्ली संघाने केवळ चार विकेट ने सामना जिंकला . दिल्लीकडून शिखर धवनने 45 आणि स्टीव्ह स्मिथने 33 धावा केल्या.
सामना संपल्यानंतर रोहीत शर्माने सांगितले की, या सामन्याची सुरुवात चांगली झाली होती, सामन्याच्या मध्यंतरी आणि पावरप्लेमध्ये अजून चांगले खेळता आले असते पण दिल्ली कॅपिटलची गोलंदाजी जबरदस्त होती त्यामुळे त्यांनी विकेट वर विकेट घेतल्या.
तसेच या सामन्यात रोहित आपल्या फिल्डिंग दरम्यान मैदानावर नव्हता. त्याच्या जागी कायरन पोलार्डने कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारली. असे म्हटले होते की रोहित फील्डिंगसाठी पूर्णपणे फिट नाही. याबाबत रोहित म्हणाला की, हि एक छोटी समस्या आहे लवकरच ठीक व्हायला पाहिजे.
चार सामन्यांत दोन विजय आणि दोन पराभवांसह मुंबई इंडियन्स आयपीएल (IPL) टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. संघाचा पुढील सामना शुक्रवारी 23 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध आहे.