फेमस

IPL 2021:RR Vs KKR: पॅट कमिन्सला हरवण्याच्या आनंदात रियान परागने केला असा ‘ड्रामा’

KKR विरुद्धच्या सामन्यातील रियान परागचा हा अनोखा अंदाज होतोय सोशल मीडियावर व्हायरल

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 14 मध्ये राजस्थान रॉयल्सचा (RR) युवा खेळाडू रियान पराग सामन्यातील आपल्या कामगिरीपेक्षा ज्या पद्धतीने सेलिब्रेशन करतो हे चाहत्यांचे आकर्षण बनले आहे. त्यातच परागच्या बिहू नृत्याची माहिती क्रिकेट चाहत्यांना आहे. रियान पराग जेव्हा कॅच (Catch) पकडतो किंवा धावबाद (Run-out) करतो तेव्हा हे नृत्य सादर करतो. दरम्यान, त्याने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध शनिवारी वेगळ्या स्टाईलमध्ये साजरा केला.

रियान परागने KKRचा फलंदाज पॅट कमिन्सचा झेल घेतला आणि सहकारी खेळाडू राहुल तेवतियाबरोबर सेल्फी घेण्याची एक्टिंग केली. त्या दोघांच्या हातात मोबाइल नव्हता किंवा चित्र क्लिक करण्याची कल्पना ही नव्हती… पण त्यांच्याकडे ही वेगळी स्टाईल होती. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ iplt20 च्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

त्याचा हा फोटो राजस्थान रॉयल्स(RR) च्या फ्रँचायझीनेही शेअर केला होता. फोटो शेअर करताना राजस्थानने विचारले की, ‘या सेल्फीचा भाग कोणाला व्हायचे आहे?’ या सामन्यात रियान परागने गोलंदाजी केली नाही, तर दोन झेल घेतले. त्याने पॅट कमिन्स व्यतिरिक्त राहुल त्रिपाठीचा ही झेल(catch) घेतला

सामन्याबद्दल सांगायचे तर कोलकाताने प्रथम फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 133 धावा केल्या. राजस्थानकडून ख्रिस मॉरिसने 23 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय पेसर जयदेव उनादकट, चेतन साकारिया आणि मुस्तफिजुर रहमान यांनी 1-1 गडी बाद केले. कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने 2 चेंडूंत 4 चौकार आणि 2 ओव्हरमध्ये 36 धावा केल्या. तसेच विकेटकिपर फलंदाज दिनेश कार्तिकने 25 तर सलामीवीर नितीश राणाने 22 धावांचे योगदान दिले.

संजू सॅमसनच्या नाबाद(not out) 42 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्स (KKR)च्या 6 विकेट्स घेऊन त्यांचा पराभव करून या सिझनमधील दुसरा विजय नोंदविला. केकेआर KKRचा डाव 9 विकेट्सवर 133 धावांवर रोखल्यानंतर त्याने 18.5 ओव्हरमध्ये 4 गडी गमावून लक्ष्य गाठले.

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात केले बिहू नृत्य

दिल्ली कॅपिटल विरूद्ध सामन्यात ऋषभ पंत रन आऊट झाल्यानंतर रियान परागने बिहू नृत्य केले. आयपीएलने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून परागच्या नृत्याचा व्हिडिओही पोस्ट केला असून तो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments