खूप काही

Mumbai Indians Team 2021 Shedule : ठरलं, यादिवशी मुंबईचा संघ उतरणार मैदानात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

IPL च्या ह्या वर्षीच्या सामन्याचे वेळापत्रक

5 वेळा आयपीएल जिंकणारी टीम मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा आयपीएलच्या तयारीला लागली आहे. आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु यांच्यात असणार आहे. मुंबई इंडियन्स ही एक सक्षम टीम आहे, जी स्वतःच्या खेळाच्या जोरावर यावेळीदेखील आयपीएल जिंकू शकते, अशी शक्यता अनेक स्थरातून वर्तवली जात आहे.

ईशान किशन आणि यादव यांनी मागच्या सीझनमध्ये उत्तम फलंदाजी केली होती. त्यांनी 516, 503 आणि 480 धावा बनवल्या होत्या. गोलंदाजीमध्ये ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह पॉवरप्लेमध्ये शानदार गोलंदाजी केली होती. त्याशिवाय त्यांनी डेथ ओव्हरमध्येही कमालीची गोलंदाजी केली होती. (mumbai indians team 2021 schedule)

या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सचे अनुभवी पियुष चावला यांनादेखील आपल्या बरोबर टीममध्ये सहभागी करून घेतले आहे, मुंबई इंडियन्सने 2013 नंतर एकही सीझनच्या सुरुवातीचा पहिला सामना कधीच जिंकला नाही, मात्र त्यानंतर त्यांनी अनेक डाव आपल्या नावावर करून घेतले.

आयपीएल 2021 च्या (IPL 2021) टीममध्ये रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सुर्यकुमार यादव, ईशान किशन, एडम मिलन, नाथन कुलटर नाईल, गक्रिस लिन, अनमोलप्रीत सिंह, सौरभ तिवारी, कीरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या, युधवीर चरक, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान, मार्को निशम, अर्जुन तेंडुलकर, पियुष चावला, जिमी नीशम हे खेळाडू असणार आहेत.

सामन्यांचे वेळापत्रक

 • 9 एप्रिल 2021ला चेन्नईमध्ये मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध आरसीबी (RCB) हा सामना संध्याकाळी 7:30 ला होणार आहे.
 • 13 एप्रिल रोजी केकेआर (KKR) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) चा सामना चेन्नईमध्ये संध्याकाळी 7:30 होणार आहे.
 • 17 एप्रिल 2021 ला मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) हा सामनादेखील चेन्नईला संध्याकाळी 7:30 ला होणार आहे.
 • 20 एप्रिलला मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC) हा सामना दुपारी दिल्लीमध्ये होणार आहे.
 • 23 एप्रिल 2021 ला पंजाब किंग्स (PK) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) हा सामना संध्याकाळी चेन्नईमध्ये होणार आहे.
 • 29 एप्रिलला मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) हा सामना दिल्लीमध्ये दुपारी 3:30 वाजता होणार आहे.
 • 1 मेला मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (CSK) हा सामना दिल्लीत संध्याकाळी होणार आहे.
 • 4 मेला मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात दिल्लीमध्ये संध्याकाळी 7.30 रोजी हा सामना होणार आहे.
 • 10 मेला बेंगलोरमध्ये मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) सामना संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे.
 • 13 मेला बेंगलोरमध्ये मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध पंजाब किंग्ज (PK) सामना दुपारी 3:30 वाजता होणार आहे.
 • 16 मेला बेंगलोरमध्ये संध्याकाळी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) सामना होणार आहे.
 • 20 मेला कोलकातामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु (RCB) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) सामना संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments