फेमस

IPL 2021 MI vs DC Match Preview : मुंबईला मिळेल दिल्लीची जोरदार टक्कर, हे खेळाडू असतील चपळ

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज ipl2021 मधील 13 सामना होणार आहे.

मुंबई इंडियन्स (mumbai indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals) हे दोन संघ या वर्षी आयपीएलच्या (IPL 2021) अव्वल संघात आहेत. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत आजचा सामना कोण जिंकेल, हे बघणे अत्यंत रोमांचक असेल. (IPL2021-mumbai Indians vs delhi daredevils match review)

गेल्या वर्षीची विजेती टीम मुंबई इंडियन्स आणि गेल्या हंगामातील उपविजेत्या दिल्ली कॅपिटलच्या या संघांचा चैन्नई येथे सामना रंगणार आहे. त्यामुळे त्यांना एकमेंकावर मात करण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतील.

मुंबईसारख्या मजबुत संघाला जर दिल्ली विरोधात सलग तिसरा विजय मिळवायचा असेल, तर जोरदार रननिती आखावी लागेल. वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्जचा सहा विकेट्सने पराभव करून दिल्ली संघ मुंबईसोबत खेळणार आहे, तर मुंबईने आपल्या टीमचा छोट्या छोट्या रननितीने सतत विजय मिळविला आहे; पण दिल्लीविरुद्ध असे होणार नाही,असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळेच मुंबईने आजच्या मॅचमध्ये उत्तम काम करणे आवश्यक आहे.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची या हंगामातील सुरुवात चांगली झाली असून तो हारायला आलेला सामना परत जिंकण्याच्या दिशेला रूपांतर करण्यास वचनबद्ध आहे आणि क्विंटन डिकॉकच्या बाबतीतही तेच घडेल. मुंबईच्या संघातील सूर्यकुमार यादव, ईशान किशन, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ क्रुणाल असे खेळाडू आहेत जे कोणत्याही दिवशी हल्लाबोल करण्यास सक्षम आहेत, परंतू अद्याप ते चमकदार कामगिरी करू शकलेले नाहीत.

या वर्षीही मुंबई इंडियन्स हाच सामना विजयी होतील, हे काही सांगू शकत नाही, पण शेवटच्या सामन्यानंतर मधल्या षटकांत आपली टीम जरा चांगली फलंदाजी करू शकते असे रोहितचे म्हणणे आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments