खूप काही

पॅनकार्ड-आधार लिंक नाही; होऊ शकतं मोठं नुकसान, या तारखेपर्यंत करा लिंक…

पॅनकार्ड-आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च होती, पण ती तारीख आता वाढवण्यात आलीय. आता शेवटची तारीख 30 जून 2021 केलेली आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नसेल त्यांना ही दिलासा देणारी बातमी आहे. परंतु ही तारीख पुढे का ढकलण्यात आली हे जाणून घेऊ.

31 मार्च ची तारीख शेवटची होती. 31 मार्चला वेबसाईटवर अधिक लोड आल्याने इन्कम टॅक्सची वेबसाईट क्रॅश झाली असल्याने अनेक जणांचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होऊ शकले नाही, त्यामुळे 30 जून या तारखेपर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.(Last Date To Link Aadhaar With PAN Extended To June 30)

31 मार्चला आयकर विभागाची वेबसाईट 12 नंतर क्रश झाली. त्यानंतर ती पूर्ववत केली गेली. परंतु त्या वेबसाईटवर सतत लोड येऊन ती वारंवार क्रश होत असल्याने लोक त्रस्त होऊन सोशल मीडियावर तारीख वाढवून देण्याची मागणी करत होते. त्यामुळे ही मुदत वाढ करून देण्यात आली आहे.

आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने लिंक करू शकतो. त्यासाठी www.incometaxindiaenfiling.gov.in या सरकारच्या वेबसाईट वरून आधारकार्ड लिंक करण्याच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म समोर येईल. त्यावर पॅन कार्ड आधार कार्ड नंबर टाकावा लागेल व त्यानंतर आपली काही व्यक्तिगत माहिती देखील भरावी लागेल. त्यानंतर एक ओटीपी येईल तो ओटीपी भरल्यानंतर आधार असा पर्याय समोर दिसेल त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड लिंक होईल.

जर मोबाईलच्या माध्यमातून लिंक करायचे असेल तर आपल्या मोबाईल नंबरवर UIDPAN <12 -digit Aadhar><10 digit PAN> टाईप करा आणि 567678 किंवा 561561 या नंबर वर एसएमएस पाठवा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments