खूप काही

केंद्र सरकारकडून LIC कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज…

एलआयसी कर्मचाऱ्यांना तब्बल 16% वेतनवाढ सरकारकडून मंजूर करण्यात आली आहे.

भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एलआयसी च्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने एलआयसीसाठी प्रत्येक शनिवार हा पब्लिक हॉलिडे केला आहे. आता शनिवारी एलआयसीच्या कोणत्याही ब्रांचमध्ये पॉलिसी संबंधित कोणतेही काम होणार नाही. त्यामुळे आपले काम सोमवार ते शुक्रवारच्या आतच करून घ्यावे लागेल. त्याच बरोबर केंद्र सरकारने एलआयसी कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे.

एलआयसी कर्मचाऱ्यांना तब्बल 16% वेतनवाढ सरकारकडून मंजूर करण्यात आली आहे. त्याच बरोबर शनिवार रविवार सुट्टी असल्याने त्यांच्या कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा केंद्र सरकारने मान्य केला आहे. या निर्णयामुळे जवळपास एक लाख 40 हजार कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. (LIC employees get 16% wage hike, 5-day-work week)

प्रत्येक शनिवारी आता रविवार प्रमाणे सुट्टी ग्राह्य धरली जाईल. कर्मचारी संघटनांनी 40 टक्के वेतनवाढीची मागणी केली होती तसेच केंद्र सरकारने घोषित निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 कलम 25 मध्ये सुधारणा केली. त्यामुळे पाच दिवसांचा कामकाज आठवडा एलआयसीला लागू होणार. नवीन वेतन वाढ 1 ऑगस्ट 2017 पासून लागू होणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments