कारण

मुंबईत होणार लॉकडाऊन? महापौर किशोरी पेडणेकरांचे नवे संकेत.

कोवीड-19 च्या वाढत्या प्रभावामुळे लागू होणार नवे लाॅकडाऊनचे नियम, महापौरांनी व्यक्त केले मत.

मुंबईत नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्यामुळे कोविड -19 चे रुग्ण वाढत आहेत तसेच व्हेंटिलेटरचे बेड देखील कमी पडत आहेत.आरोग्य व्यवस्थेवर होणारा बोजा कमी होणे गरजेचे असल्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर यांनी 2 एप्रिलपासून आणखी कडक निर्बंध आणण्याचे संकेत दिले आहेत.

काय काय परिणाम होऊ शकतात?

धार्मिक स्थाने व सर्व सिनेमागृह पूर्णपणे बंद केली जाऊ शकतात .

स्थानिक सेवांमध्ये आवश्यक सेवा कर्मचार्‍यांव्यतिरिक्त प्रवाश्यांची पुन्हा एकदा बंदी घातली जाऊ शकते .

खाजगी कार्यालये दोन शिफ्टमध्ये धावण्याचा आदेश देऊ शकतात .

आजच्या घडीला कोवीड-19 वर औषध नसल्याने राज्य सरकार किंवा महानगरपालिका काही निर्णय घेऊन
अतिशय जोमाने काम करत आहे ,लोकांनी मनात आणलं तर कोरोना जाईल यासाठी यंत्रणा सज्ज असली तरी लोकांनी काळजी घेतली पाहिजे ,असे महापौरांचे मत आहे.

मुख्यमंत्री व राज्यसरकार जे नियम देतील त्याचे पालन करणे हे पालिकेचे काम असले तरी नियम मोडल्यास त्यांच्यावर कारवाई करणे देखील महत्त्वाचे आहे .

मुख्यमंत्री जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी आणि आयुक्तनांशी बोलून जो निर्णय घेतील तो योग्यच असेल त्यामुळेच राजकारण कधीही करता येईल पण ज्या जनतेच्या जीवावर आपण निवडून येतो त्यांच्या हिताचा विचार करायला हवा असे मत महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे .

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments