आपलं शहर

ठरलं, यादिवशी लॉकडाऊन; मंत्र्यांकडून अल्टिमेटम, राज्य सरकारची तयारी

लॉकडाऊनच्या चर्चांना उधाण आलं असताना आता लॉकडाऊन कधी लागणार याची तारीख थोड्याफार प्रमाणात जाहीर झाल्यात स्पष्ट आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या स्ट्रोनमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून लॉकडाऊन हा एकमेव पर्याय निवडला जात आहे. राज्यातील अनेक मंत्र्यांनीदेखील लॉकडाऊनबाबत अनेक संकेत दिल्याने लॉकडाऊनची तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचे दिसत आहे. (Lockdown in Maharashtra from this date)

राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी येत्या दोन दिवसात लॉकडाऊन लावण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे म्हटलं आहे. 13 एप्रिल रोजी गुडीपाडवा तर 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, त्यानंतर येत्या 15 एप्रिलपासून लॉकडाऊनची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारकडून लॉकडाऊनशी तयारी सुरु असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांच्या मते राज्यात लॉकडाऊन लावण्याचे निश्चित झालं आहे.

राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय विडेट्टीवार यांनीदेखील लॉकडाऊन लावावाच लागेल, अशी तिव्र प्रक्रिया नोंदवली आहे. लॉकाडाऊन लागला नाही, तर रुग्णांच्या मृतांचा खच पडेल, त्यामुळे फक्त 8 दिवसांचा नव्हे, तर 14 दिवसांचा लॉकडाऊन लावावा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. (Lockdown in Maharashtra from this date)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments