खूप काही

Lockdown Update | विमान कंपन्यांनी कोरोनाचे नियम मोडले, थेट FIR दाखल

इंडिगो, विस्तारासारख्या चार विमान कंपन्यांविरोधात DDMA कायद्याअंतर्गत FIR दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने दिल्लीवर पूर्णपणे कब्जा केला आहे. दिल्लीत दररोज कोरोनाचे हजारो नवीन रुग्ण समोर येत आहेत. शनिवारीही महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशानंतर दिल्ली कोव्हिड संक्रमणात तिसर्‍या क्रमांकावर होते.

कोरोनाची बिघडणारी परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी दिल्ली सरकारवर आता कारवाई करण्याची वेळ आली आहे. कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास किंवा नियम मोडल्यास कठोर कारवाई केली जाईल याची झलक शासनानेही दाखविली आहे.

कुंभमेळा तसेच महाराष्ट्रातून राजधानी दिल्लीत परत येणार्‍यांनी आरटीपीसीआर(RTPCR) चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आपल्यासमवेत आणावा, असे स्पष्ट निर्देश दिल्ली सरकारने दिले होते. हाच नियम मोडल्याबद्दल आता दिल्ली सरकारने इंडिगो, विस्तारा, स्पाइस जेट आणि एअर एशियाच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली सरकारने इंडिगो, विस्तारा, एअर एशिया आणि स्पाइस जेट या विमान कंपन्यांनी महाराष्ट्रातून येणार्‍या सर्व प्रवाशांची आरटी-पीसीआर (RTPCR) चाचणी केली नव्हती. डीडीएमए(DDMA) कायद्यांतर्गत सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे शनिवारी दिल्लीत 24 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून कोरोनामुळे 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तरीही राजधानीतील कोरोनावर कोणत्याही प्रकारे नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरुच आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments