आपलं शहर

मुंबईमधील बाजार आणि रेल्वे स्टेशनवर दिसून येतेय मोठ्या प्रमाणात गर्दी

एकीकडे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे तर दुसरीकडे गावी जाण्यासाठी लोक रेल्वे स्टेशन वर गर्दी करताना दिसत आहे.

लॉकडाऊनच्या भीतीने लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशन वर मोठ्या संख्येने लोक आपापल्या गावी जाताना दिसू लागलेत. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या लॉकडाउनच्या वक्तव्यानंतर दादरच्या भाजी मंडईमध्ये आणि बाजारामध्ये सातत्याने गर्दी दिसू लागली. लॉकडाऊनमुळे लोक बाजारात खरेदीसाठी बाहेर पडू लागले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते की जर परिस्थिती सुधरली नाही आणि कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही तर शेवटचा पर्याय हा लॉकडाऊन असेल. त्यामुळे सामान्य जनता भीतीने जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाहेर पडू लागली आहे.(Large crowds can be seen at the markets and railway stations in Mumbai)

दादरमध्ये शनिवारी खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. त्यामुळे काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात निराशा व्यक्त केली असून, त्याने याबाबत ट्विट देखील केलेले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये बाजाराचे फोटोज शेअर केले आहे व त्याच बरोबर ‘दादर आणि इतर अनेक बाजारामध्ये गर्दी होण्याचं कारण काय? कारण अस आहे की लोक लॉकडाऊनच्या भीतीने खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. हे उद्धव ठाकरे यांच्या लॉकडाउनच्या धमकीचे दुष्परिणाम आहेत’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

एकीकडे बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे तर दुसरीकडे गावी जाण्यासाठी लोक रेल्वे स्टेशन वर गर्दी करताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात लोक महाराष्ट्रातून युपी-बिहार ला जाताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन करणार असे संकेत दिले असल्याने लोक घाबरून गावी जाण्यासाठी गर्दी करत आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments