खूप काही

Maharashtra corona update:लाॅकडाऊननंतर राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट…

लाॅकडाऊनमुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधित रूग्ण संख्येत सातत्याने घट होत आहे.

लॉकडाऊननंतर राज्यात प्रथमच कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत 48,700 नवीन संसर्गजन्य रुग्ण आढळले आहेत. 1 मार्चनंतर महाराष्ट्रातील ही रुग्णांची संख्या आतापर्यंत सर्वात कमी आहे. मात्र, या काळात राज्यात एकूण 534 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत एकूण 71,736 क रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता राज्यात 6,74,770 पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात 43 लाख 43 हजार 727 कोरोना रुग्ण असून 65,284 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पुन्हा एकदा मुंबईत पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. गेल्या 24 तासांत येथे केवळ 3,876 रुग्ण आढळले आहेत. तसेच, आकडेवारीनुसार असे समोर आले आहे की गेल्या 7 दिवसांत पालिकेकडून चाचणी घेण्यात कपात करण्यात आली आहे. यासह मुंबईत रिकव्हरी रेट 87 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या 24 तासात शहरात 70 मृत्यू देखील झाले आहेत. आतापर्यंत 6 लाख 31 हजार 527 पॉझिटीव्ह लोक मुंबईत बरे झाले आहेत.

एका दिवसात महाराष्ट्रात 5 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. ही आकडेवारी सोमवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची आहे. यापूर्वी 3 एप्रिल रोजी 4 लाख 62 हजार 735 लोकांना लस देण्यात आली होती. आतापर्यंत येथे 1 कोटी 48 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray )आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी यासाठी लसीकरण कार्यक्रमाशी संबंधित सर्व अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी यांचे आभार मानले आहेत.

1 मेपासून महाराष्ट्रात लसीकरण होणार की नाही ?

1 मेपासून देशभरात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे लसीकरण सुरू होणार आहे. परंतू, महाराष्ट्रात लसींच्या साठयाची कमतरता पाहता या मोहिमेला ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी, 4 काँग्रेस शासित राज्ये आणि केरळने 18 वर्षांवरील लोकांना लस न देण्याचे ठरविले आहे.

महाराष्ट्राने सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांना पत्र लिहिले आहे, परंतु त्यांनी अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एका राज्य अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ‘ सध्याचा लसींच मोठा साठा हा केंद्र सरकारने बुक केला असल्याचे दिसून येते ,पण एखाद्या राज्यात किती साठा पुरवठा करायचा याचा निर्णय घेण्यात लस उत्पादकांची मोठी भूमिका आहे. ‘

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments